मंडळ अधिकाऱ्यास जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी प्रणय खुणे ला पाच दिवसांची पोलीस कोठडी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
दगड उत्खनन करून वाहतूक करीत असताना वाहनांची चौकशी करून  वाहतूक परवान्याविषयी चौकशी करीत असताना शासकीय कामात अडथळा आणून मंडळ अधिकाऱ्याला  जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी अहेरी पोलिसांनी मंडळ अधिकाऱ्याच्या  तक्रारीवरून प्रणय एन. खुणे रा. गडचिरोली व अन्य तिघांविरोधात गुन्हा दाखल केला होता. प्रणय खुणे याला अहेरी पोलिसांनी अटक केली असून न्यायालयात हजार केले असता न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली आहे. 
आलापल्लीचे मंडळ अधिकारी संतोष व्यंकटराव श्रीरामे यांनी अहेरी पोलिस ठाण्यात  तक्रार दाखल केली होती.  बोरी येथील बाबा दुर्गाजी मोहुर्ले यांच्या मालकीच्या जागेतील ५० ब्रॉस दगड उत्खनन करण्याची परवानगी गणेश बुधाजी खुणे यांनी घेतली होती. २६ जून २०२० रोजी अहेरीच्या तहसीलदारांली  अस्थायी परवाना आदेश पारीत केला होता. परंतु आदेशामध्ये दिलेल्या प्रमाणापेक्षा अतिरीक्त उत्खनन होणार नाही याची तपासणी करण्यासाठी  मंडळ अधिकारी श्रीरामे  २७ जून रोजी कोतवाल किशोर शंकर दुर्गे रा. खमनचेरू यांना सोबत घेवून गेले होते.  यावेळी उत्खनन होत असलेल्या ठिकाणी  पी.एन. खुणे व अन्य उपस्थित होते. परवाना तपासणी करून मंडळ अधिकारी श्रीरामे अहेरी कडे येत असताना बोरी गावाजवळील बांबु डेपो जवळ एमएच ३३ सियु ०६५० व एमएच ३३ सियु ०४१६ या क्रमांकाच्या दहा चाकी टिप्पर मध्ये दगड भरून आलापल्लीकडे येत असल्याचे दिसले. वाहनांना थांबवून विचारणा केली असता चालकाने मागून तिसरा ट्रक येत असून परवाना आणत आहे, असे सांगितले.  यामुळे आधी आलेले दोन ट्रक निघून गेले. यानंतर लगेच तिथे पांढऱ्या  रंगाची एमएच ४० बिई १०२२ क्रमांकाची बोलेरो कार आली.  या वाहनातून प्रणय खुणे रा. गडचिरोली आणि अन्य तिघे जण आले होते.  या चौघांनी वाहनातून उतरून मंडळ अधिकारी श्रीरामे यांना हाताबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच तपासणी करण्याचा अधिकार तुला कोणी दिला, असे म्हणून शिविगाळ केली. तसेच कामात अडथळा आणून जिवे मारण्याची धमकी दिली. मंडळ अधिकारी श्रीरामे यांनी पोलिसात तक्रार दिल्यानंतर आरोपी खुणे याच्यासह अन्य तिघांवर भांदवि कलम १८६, ३३२, ३४, ३५३, ५०४, ५०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता पाच दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.  पुढील तपास अहेरी पोलिस करीत आहेत.
  Print


News - Gadchiroli | Posted : 2020-07-07


Related Photos