जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या पाठपुराव्याने गडचिरोली जिल्ह्यातील जि. प. शाळांमधील पायाभूत सुविधांसाठी ६ कोटींचा निधी मंजूर


- शाळांमधील वर्गखोली, शौचालय दुरुस्ती व बांधकामासह हॅडवाॅश स्टेशन, किचन शेडची सुविधा होणार उपलब्ध

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
जिल्ह्यातील नगर परिषद व नगरपंचायत प्रशसनाच्या दुर्लक्षितपणामुळे त्या क्षेत्रातील शाळांमधील पायाभूत सुविधांच्या दुरुस्तीसाठी तसेच नवीन बांधकामासाठी निधी मिळू शकला नाही. त्यामुळे जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी जिल्हा परिषद प्रशासनाकडे निधीच्या मंजुरीसाठी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या या पाठपुराव्याला यश मिळाले असून जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत जिल्ह्यातील विविध तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये नवीन वर्गखोली, शौचालय बांधकाम व दुरुस्तीसह हॅडवाॅश स्टेशन, किसन शेड बांधकामासाठी ६ कोटी २५ लाख ८५ हजार ४६२ रुपयांचा निधी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर करणयात आला आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील पायाभूत व भौतिक सुविधांच्या दुरुस्तीसाठी तसेच नवीन सुविधांच्या बांधकामासाठी संबंधित नगर परिषद व नगरपंचायतीकडून निधी मंजूर करणे अपेक्षित असतेण् मात्र जिल्ह्यातील नगर परिषद व नगरपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे जिल्हा परिषद शाळांमधील विविध सुविधांच्या बांधकामासाठी निधी मंजूर होऊ शकला नाहीण् अनेक शाळांमध्ये वर्गखोली व शौचालये नादुरुस्त आहेत. तसेच अनेक ठिकाणच्या शाळांमध्ये हॅन्डवाॅश स्टेशन व किचन शेड नसल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. ही अडचण जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी लक्षात घेऊन जिल्हा परिषद प्रशासनाकडे निधीसाठी सातत्याने पाठपुरावा केला. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत ६ कोटी २५ लाखांच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये एटापल्ली तालुक्यातील ६ शाळा, मुलचेरा तालुक्यातील २ शाळा, चामोर्शी तालुक्यातील ४ शाळा, भामरागड तालुक्यातील ७ शाळा, अहेरी तालुक्यातील ५ शाळा, धानोरा तालुक्यातील १ शाळा, कोरची तालुक्यातील १ शाळा, आरमोरी तालुक्यातील 2 शाळा, सिरोंचा तालुक्यातील ३ शाळांमध्ये नवीन वर्गखोली, वर्गखोली दुरुस्ती, शौचालय दुरुस्ती, नवीन शौचालय बांधकाम, हॅन्डवाॅश स्टेशन, किसन शेड बांधकामासाठी ३ कोटी ८९ लाख १८ हजर ११४ रुपयांचा निधीला मंजुरी देण्यात आली आहे. तसेच चामोर्शी तालुक्यातील १ शाळा, धानोरा तालुक्यातील २ शाळा, कोरची तालुक्यातील एका शाळेत नवीन वर्गखोली, वर्गखोली दुरुस्ती, शौचालय दुरुस्ती, नवीन शौचालय बांधकाम, हॅन्डवाॅश स्टेशन व किसन शेड बांधकामासाठी २ कोटी ३६ लाख ६७ हजार ३१८ रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे. त्याबद्दल गडचिरोली जिल्ह्यातील पालक, नागरिक व विद्याथ्र्यांकडून जिल्हा परिषद प्रशासन व जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांचे आभार मानण्यात येत आहे.
  Print


News - Gadchiroli | Posted : 2020-07-01


Related Photos