महत्वाच्या बातम्या

 राज्यात १० हजार ग्रामसेवक पदांची मेगा भरती होणार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वुत्तसंस्था / मुंबई : ग्रामविकास विभागाच्या अखत्यारीतील जिल्हा परिषद अंतर्गत गट-क मधील सर्व संवर्गाची वाहन चालक व गट- ड संवर्गातील पदे वगळून सरळसेवेच्या कोट्यातील रिक्त पदांच्या ८०% मर्यादे पर्यंत रिक्त पदे भरण्यात येणार आहे. सदर मान्यता ही वित्त विभागाच्या निर्देशानुसार १५ ऑगस्ट २०२३ पर्यंत लागू राहील. त्यापुढील भरती प्रक्रिया वित्त विभागाचा शासन निर्णय ३० सप्टेंबर २०२२ नुसार सुधारित आकृतिबंध शासनाने मान्य केल्यावरच करता येणार आहे. जिल्हा परिषदांतील गट-क मधील सर्व संवर्गाची वाहन चालक व गट-ड संवर्गातील पदे वगळून रिक्त पदे संवर्गनिहाय आरक्षण नियमानुसार निश्चित करून जिल्हा परिषदांनी त्यांच्या स्तरावर जिल्हा निवड मंडळामार्फत परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक देण्यात आले आहे. १ ते ७ फेब्रुवारी २०२३ दरम्यान पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतर पुढे २२ फेब्रुवारी पर्यंत उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येतील. २३ फेब्रुवारी ते १ मार्च २०२३ दरम्यान अर्जाची छाननी करण्यात येणार आहे. तर २ ते ५ मार्च २०२३ दरम्यान पात्र उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार आहे. ६ ते १३ एप्रिल २०२३ दरम्यान पात्र उमेदवारांना प्रवेशपत्र उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तर १४ ते ३० एप्रिल २०२३ या कालावधीत ऑनलाइन/ऑफलाइन माध्यमातून परीक्षेचे आयोजन केले जाणार आहे. या वेळापत्रकाचे सर्व जिल्हा परिषदांना पालन करावे लागणार आहे. त्या करिता रिक्त पदे एकूण रिक्त पदांच्या ८०% मर्यादेपर्यंत, त्यांची आरक्षण निश्चिती, उमेदवारी अर्ज मागविणे, सदर परीक्षेच्या आयोजनासाठी कंपनी निवडणे आवश्यक असल्यास, परीक्षा घेण्यासंबंधीची सर्व जबाबदारी ही जिल्हा निवड मंडळाची व जिल्हा परिषदेची असेल. महाराष्ट्र शासनाची अधिकृत वेबसाइट www.maharashtra.gov.in वर याचा अधिक तपशील देण्यात आला आहे. त्याचा संकेताक २०२२१११५११२३०३६७२० असा आहे. ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी पदाकरिता परीक्षा देणाऱ्या इच्छुकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. ग्रामसेवक आणि ग्रामविकास आधिकारी ही पदं लवकरच रद्द होणार आहेत. या ऐवजी पंचायत विकास अधिकारी हे एकच पद निर्माण केले जाईल. या संबंधीची मागणी ग्रामसेवक संघटनेकडून अनेक दिवसांपासून होत होती. त्यानुसार राज्य सरकारने देखील ही पदे रद्द करून एकच पद तयार करण्यासाठीची तयारी सुरु केली आहे. नाशिक येथील विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेसाठी यासाठीची समिती नेमण्यात आली आहे. रद्द झालेल्या दोन्ही पदांची वेतनश्रेणी, पदोन्नती आदी बाबींचा सविस्तर अभ्यास या समिती तर्फे केला जाईल आणि त्यानुसार नवीन पदासाठीचे नियम ठरवले जातील. समितीने सहा महिन्यांच्या आता अहवाल सादर करावा, अशा सूचना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिला आहे. ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी पद रद्द करून नवे पद निर्माण करण्याची आवश्यकता आणि त्याची कारणमीमांसा करण्याची जबाबदारी या समितीवर देण्यात आली आहे. तसेच ग्रामविकास अधिकारी व ग्रामसेवक यांची स्वतंत्र वेतनश्रेणी असल्याने एकच पद निर्माण केल्यास अनुज्ञेय वेतन श्रेणीचा अभ्यास केला जाईल. तसेच वेतन, वेतन श्रेणी, कालबद्ध पदोन्नती, वित्तीय परिगणना आणि इतर बाबींचा अभ्यास करून शासनाला सहा महिन्याच्या मुदतीत अहवाल सादर करणार आहे. ग्रामसेवकावर दोन ते तीन तर काहींवर चार ग्रामपंचायतींचा प्रभार आहे, परिणामी, ग्रामसेवक एक दिवस या ग्रामपंचायतीमध्ये, तर दुसऱ्या दिवशी त्या ग्रामपंचायतीमध्ये कर्तव्य बजावत असतात. मागील काही वर्षांपासून ग्राम सेवक भरती झाली नाही. याउलट अनेक ग्राम सेवक सेवानिवृत्त झाले. त्यामुळे रिक्त पदांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे ग्रामसेवकांची रिक्त भरण्यात यावी अशी मागणी ग्रामसेवक संघटनेकडून अनेकदा करण्यात आली. सिंदेवाही तालुक्यातील ग्रामसेवकांची रिक्त पदे भरण्यात न आल्यामुळे विकास कामे खोळंबली आहेत. सिंदेवाही पंचायत समिती अंतर्गत ५० ग्रामपंचायती असून, या ग्रामपंचायतींचा कारभार २२ ते २४ ग्रामसेवक सांभाळत आहेत. याच २४ ग्रामसेवकांपैकी दोन-तीन ग्रामसेवक पंचायत समितीच्या कार्यालयात दत्तक असल्यासारखे आहेत. तालुक्यातील ग्रामसेवकांची रिक्त पदे भरण्यात न आल्यामुळे विकासकामे खोळंबली आहेत. पांढरकवडा पंचायत समिती अंतर्गत ७४ ग्रामपंचायती असून, या ग्रामपंचायतीचा कारभार केवळ ४८ ग्रामसेवक सांभाळत आहेत. या ४८ ग्रामसेवाकांपैकी दोन-तीन ग्रामसेवक पंचायत समितीच्या कार्यालयात दत्तक असल्यासारखे आहेत. त्यामुळे उर्वरित असल्यासारखे आहेत. त्यामुळे उर्वरित ग्रामसेवक ७४ ग्रामपंचायतीचा कारभार कसा सांभाळत असतील, हा संशोधनाचा विषय आहे.





  Print






News - Rojgar




Related Photos