महत्वाच्या बातम्या

 दुचाकी चालकाला वाचवण्याच्या प्रयत्नात कार चालकाचा मृत्यू : एक जण जखमी


- वडसा-आरमोरी मार्गावरील घटना

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

शहर प्रतिनिधी / देसाईगंज : विरुद्ध दिशेने येत असलेल्या स्कूटीला वाचविण्याच्या प्रयत्नात कारचे नियंत्रण सुटून ती रस्त्याच्या कडेला खड्डयात उलटली. यात कार चालकाचा मृत्यू झाला. तर, कारमधील एकजण किरकोळ जखमी असून दुसरा थोडक्यात बचावला आहे. ही घटना आज (दि. १२) सकाळी साडे आठच्या सुमारास वडसा-आरमोरी मार्गावरील पाच पांडव देवस्थानाजवळ घडली.

पवन राऊत (२२, रा. मिरची वार्ड वडसा) असे मृत युवकाचे नाव असून भरत मेश्राम (रा. लोहारा ) असे किरकोळ जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर प्रशांत कावळे (रा. वडसा) हा सुखरूप बचावला आहे. पवन आणि प्रशांत हे दोघे ब्रह्मपुरी पॉलिटेक्निक कॉलेजचे विद्यार्थी आहेत. रविवारी काही कामानिमित्त भंडाराला जायचे असल्याने त्यांनी आरमोरी येथील एका मित्राची महिंद्रा झायलो कार मागिलती. मात्र परतताना उशीर झाल्याने कार आरमोरीला आणून देता स्वतःजवळ ठेवली. आज सकाळी मित्राची कार परत करून देण्यात हे मित्र आरमोरीकडे निघाले. कार परत करून ते ब्रम्हपूरीला विद्यालयात जाणार होते परंतु वाटेतच काळाने घाला घातला अपघातात कार चालक पवनच्या डोक्याला जबर मार लागून रक्तस्त्राव सुरू झाला. यावेळी रस्त्याने प्रवास करणाऱ्या एका प्रवासीने अपघात झाल्याचे बघून जखमीला उलटलेल्या कारमधून बाहेर काढून आरमोरी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र,उपचारादरम्यान पवनची प्राणज्योत मालवली.





  Print






News - Gadchiroli




Related Photos