गडचिरोलीत चप्पल दुकानाला आग लागून जवळपास ४० लाखांचे नुकसान


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली
: शहरातील धानोरा मार्गावरील महिला बाल रूग्णालयासमोर असलेल्या ओम फुटवेअर या दुकानास काल २८ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजताच्या सुमारास शार्ट सर्कीटने आग लागली. या आगीमध्ये ३५ ते ४० लाखांचे नुकसान झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
धानोरा मार्गावर श्रीनिवास कोटावार यांच्या मालकीचे ओम फुटवेअर नामक चप्पलचे दुकान आहे. दुकानाला लागूनच गोदामसुध्दा आहे. काल २८ सप्टेंबर रोजी शार्ट सर्कीटने अचानक दुकानास आग लागली. सोबतच गोदामातील साहित्य सुध्दा जळून खाक झाले. दुकानातील चप्पलसह फर्निचर व इतर साहित्य आगीत भस्मसात झाले. नगर परिषदेचे अग्नीशमन वाहन दाखल झाल्यानंतर आग आटोक्यात आणण्यात आली. 

   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-09-29


Related Photos