महत्वाच्या बातम्या

 ब्रह्मपुरी पोलिसांचा दणका! विदेशी दारूच्या तस्करीचा पर्दाफाश : ६.४२ लाखांचा मुद्देमाल जप्त, एक ताब्यात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : विनापरवाना विदेशी दारूची वाहतूक करताना ब्रह्मपुरी पोलिसांनी ५२८ बाटल्या विदेशी दारू आणि मारुती सुझुकी अर्टिगा कार असा एकूण ६ लाख ४२ हजार ५६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई २३ ऑक्टोबर रोजी तुलानमाल ते वायगाव मार्गावर करण्यात आली. या प्रकरणी आरोपीआकाश अजय राम ३० वर्ष रा. वार्ड क्रमांक १७, मूल, जि. चंद्रपूर याला ताब्यात घेतले असून आरोपी संजू जुगनसिंग पटवा रा. मूल, जि. चंद्रपूर हा फरार असून, त्याचा शोध सुरू आहे.

पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, वायगाव ते तुलानमाल मार्गावरून पांढऱ्या रंगाच्या अर्टिगा कारमधून अवैधरित्या विदेशी दारूची वाहतूक होणार होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तुलानमाल ते वायगाव मार्गावरील विनायक आदे यांच्या शेताजवळ सापळा रचला. काही वेळातच संशयित पांढऱ्या रंगाची अर्टिगा कार तेथे आली. पोलिसांनी कार थांबवून तपासणी केली असता, त्यामध्ये विदेशी दारूचा साठा आढळून आला.

कारमधून रॉयल स्टॅग एक्सक्विझिट व्हिस्कीच्या १८० मिली क्षमतेच्या एकूण ५२८ सीलबंद बाटल्या जप्त करण्यात आल्या. या दारूची किंमत १ लाख ४२ हजार ५६० रुपये असून, वाहतुकीसाठी वापरण्यात आलेल्या मारुती सुझुकी अर्टिगा कारची किंमत ५ लाख रुपये आहे. अशा प्रकारे एकूण ६ लाख ४२ हजार ५६० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

जप्त केलेला दारूसाठा संजू जुगनसिंग पटवा याचा असून, त्याच्या सांगण्यावरून आपण हा साठा कारमधून घेऊन जात असल्याचे आकाश अजय राम याने पोलिसांना सांगितले. या प्रकरणी दोघांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमाच्या कलम ६५ (अ) आणि ८३ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

सदर कारवाई ब्रम्हपुरी पोलीस ठाण्याचे ठाणेदार कांचन पांडे यांचा नेतृत्वात कारवाई सहायक पोलीस निरीक्षक मनोज खडसे, पोलीस हवालदार मिलिंद नैताम, मुकेश गजबे, पोलीस अंमलदार वशिष्ठ रंगारी, निलेश तुमसरे, प्रवीण भिवगडे आणि स्वप्निल पळसपगार यांनी केले.





  Print






Related Photos