महत्वाच्या बातम्या

 लॉयड्स मेटल अँड एनर्जी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक यांची भामरागडला भेट


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / भामरागड : गडचिरोली जिल्ह्यात लॉयड्स मेटल अँड एनर्जी लिमिटेड या कंपनीचे काम सुरू आहे.भामरागड तालुक्यात आलेल्या महापुराच्या पार्श्वभूमीवर कंपनीच्या माध्यमातून अनेकदा मदत साहित्य पुरवण्यात आले होते. येथील विदारक परिस्थिती प्रसारमाध्यमाच्या साहाय्याने पाहिल्यानंतर भामरागड तालुका प्रत्यक्ष पाहण्याची उत्सुकता अधिक वाढल्याने व्यवस्थापकीय संचालकांनी स्वतः हेलिकॉप्टर चालवत भामरागड गाठले.

भामरागड तालुक्यात प्रवेश करताच शाळकरी मुलांनी लॉयड्स मेटल अँड एनर्जी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक बी.प्रभाकरन यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.त्यानंतर भामरागड तालुक्यातील व्यापाऱ्यांची अवस्था पाहून त्यांना होईल त्या पद्धतीने मदत करण्याचे आश्वासन दिले.तसेच भामरागड तालुक्यातील अधिकाधिक विद्यार्थ्यांना लॉयड्सराज विद्या निकेतन विद्यालय हेडरी येथे प्रवेश मिळवून देण्याचा शब्द दिला. 

तालुक्यातील आरोग्य व्यवस्था बळकट करण्यासाठी एक सुसज्ज रुग्णवाहिका आणि एक वैद्यकीय पथक देण्याचेही त्यांनी ठरवले आहे.सर्वात महत्त्वाचे म्हणजे झारेगुडा,गोल्लागुडा आणि या मार्गावर येणाऱ्या इतर दहा गावांतील नागरिकांना ये-जा करण्यासाठी पाण्यातून छोट्या नावेच्या साहाय्याने जीवघेणा प्रवास करावा लागतो.याची गंभीर दखल घेऊन लवकरात लवकर या नदीवर पूल बांधून देण्याचे आश्वासन दिले आणि त्यासाठी शासकीय परवानगी घेण्याकरिता संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांचीहि भेट घेतली. यावेळी भोलू सोमनानी, डॉ.चरणजितसिंग सलुजा आणि लॉयड्स मेटल अँड एनर्जी लिमिटेडचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.





  Print






Related Photos