महत्वाच्या बातम्या

 भाजप - काॅंग्रेसने शेतकऱ्यांचा सत्यानाश केला : भाई रामदास जराते 


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : जिल्ह्यात सुरू असलेली भूसंपादन प्रक्रिया थांबवणे  कठीण झाले असून शेतकऱ्यांचा घात करण्याचे काम भाजप - काॅंग्रेसने केले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात होणाऱ्या दोन लाख एकर जंगल आणि शेतजमीनीचे भूसंपादन थांबवणे कठीण झाले असून जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा सत्यानाश करण्याचे काम करणाऱ्यांना जनतेने धडा शिकवावा, असे आवाहन शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई रामदास जराते यांनी केले आहे.

शेतकरी कामगार पक्षाच्या जिल्हा कार्यालयात जिल्हा समितीच्या बैठकीत ते मार्गदर्शन करतांना म्हणाले की, गडचिरोली जिल्ह्यात काॅंग्रेसने कायद्यांना बगल देऊन लोह खाणी मंजूर केल्या. नक्षलवाद्यांच्या नावाखाली स्थानिकांचा आवाज दडपून टाकत पोलीस बळाच्या जोरावर खाणी सुरू केल्या. आणि आता भाजपच्या सरकारने खाणींसोबतच प्रक्रिया उद्योगांचा घाट घातल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर आपल्या शेतजमिनी कवडीमोल भावाने गमावण्याची वेळ आली, अशी टिकाही भाई रामदास जराते यांनी केली.

शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी आणि जमिनी वाचविण्यासाठी येत्या काळात जिल्हाभरातील शेतकरी आणि आदिवासींना लाल झेंड्याखाली एकत्र आणत शासनाच्या निती विरोधात विद्रोह पुकारण्याचे काम शेतकरी कामगार पक्ष करणार असल्याची माहितीही त्यांनी यांनी यावेळी दिली.

उद्योगांच्या नावाने जमीनी लाटणारेही तेच आणि विरोधाचे नाटक करणारेही तेच अशी स्थिती जिल्ह्यात असून शेतकऱ्यांनी भावनिक न राहता या जमीन चोर आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांपासून सजग राहावे, असे आवाहनही भाई रामदास जराते यांनी केले आहे.

यावेळी जयश्री वेळदा, युवक नेते भाई अक्षय कोसनकर, जिल्हा समितीचे पदाधिकारी रमेश चौखुंडे, पांडुरंग गव्हारे, अशोक किरंगे, महागू पिपरे, दामोदर रोहणकर, डंबाजी भोयर, प्रभाकर गव्हारे, पवित्र दास, राजू केळझरकर, चिरंजीव पेंदाम, उमाकांत मुनघाटे, बाळा मेश्राम, ईश्वर मंगर, योगेश चापले, हिराचंद कोटगले, विलास अडेंगवार, कुमदेव गायकवाड, विजय कत्रोजवार, सुरेश गेडाम, बापूजी पिपरे, विनोद गेडाम, कविता ठाकरे, सोनाली कवडो, आशा मेश्राम, शितल कांबळे, वनिता साखरे प्रामुख्याने उपस्थित होते.





  Print






Related Photos