लॉकडाऊन दरम्यान १ एप्रिलपासून १० बँकांचे विलिनीकरण


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / नवी दिल्ली :
कोरोनाचे  संकट आणि लॉकडाऊन या दरम्यान देशाची बँकिंग व्यवस्था सुधारण्यासाठी सरकार १ एप्रिलपासून बँकांचे  विलिनीकरण करणार आहे. सरकारच्या या निर्णयाने बँकिंग व्यवस्थेला अधिक मजबूती मिळणार आहे. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच १० बँकांचे  विलिनीकरण करत ४ नवीन बँकां बनवण्यात येणार आहेत.
यूनायटेड बँक ऑफ इंडिया आणि ओरियंटल बँक ऑफ कॉमर्सचं विलिनीकरण पंजाब नॅशनल बँकेत करण्यात आले आहे. या बँकांच्या विलिनीकरणानंतर सार्वजनिक क्षेत्रातील दुसरी सर्वात मोठी बँक बनली आहे. तर सिंडिकेट बँकेचं कॅनरा बँकेसोबत विलिनीकरण झाले आहे. त्याशिवाय अलाहबाद बँकेचे  इंडियन बँकेत विलिनीकरण झाले आहे. तर आंध्रा बँक आणि कॉरपोरेशन बँकचे यूनायटेड बँक ऑफ इंडियामध्ये विलिनीकरण झाले आहे.
या विलिनीकरणानंतर देशात सात मोठ्या बँका असणार आहेत, ज्यांचा व्यवहार ८ लाख कोटी रुपयांहून अधिक असेल. विलिनीकरणानंतर देशात सात मोठ्या बँका आणि पाच छोट्या बँका असतील. २०१७  मध्ये सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची संख्या २७  इतकी होती. त्याशिवाय सरकारने बँक ऑफ बडोदा, देना बँक आणि विजया बँक यांचं विलिनीकरण केले . या तीन बँकांच्या विलिनीकरणानंतर बनणारी बँक देशातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी बँक असेल.

   Print


News - World | Posted : 2020-03-29


Related Photos