महत्वाच्या बातम्या

 जिल्हा युवा पुरस्कारासाठी २ जानेवारीपर्यंत प्रस्तावाची मागणी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / चंद्रपूर : क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या वतीने सण २०१९-२०, २०२०-२१ व २०२१-२२ या वर्षातील जिल्हा युवा पुरस्कारासाठी युवक कल्याण क्षेत्रात कार्य करणारे युवक, युवती व नोंदणीकृत संस्थाकडून २ जानेवारी २०२३ पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत.

युवा पुरस्कारासाठी चंद्रपूर जिल्ह्यातून वैयक्तिक स्वरूपात एक युवक-युवती व एक नोंदणीकृत संस्था यांची निवड करण्यात येणार आहे. या पुरस्काराचे स्वरूप युवक व युवती यांना प्रत्येकी रोख रुपये १० हजार, गौरवपत्र व सन्मानचिन्ह असे आहे. संस्थेकरिता पुरस्काराचे स्वरुप रोख रु. ५० हजार, गौरवपत्र व सन्मानचिन्ह असे आहे. संस्था ह्या सार्वजनिक विश्वस्त अधिनियम १८६० किंवा मुंबई पब्लिक ट्रस्ट ॲक्ट १९५० नुसार पंजीबद्ध असावे. पुरस्कारासाठी अर्ज करणारे युवक व युवती यांचे वय १ एप्रिल २०१९, २०२० व २०२१ रोजी १३ वर्ष पूर्ण व ३१ मार्च २०२०, २०२१ व २०२२ रोजी ३५ वर्ष किंवा त्यापेक्षा कमी असावे.

तरी, चंद्रपूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवक-युवतींनी तसेच नोंदणीकृत संस्थांनी जिल्हा क्रीडा अधिकारी, चंद्रपूर या कार्यालयातून विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करून घ्यावे व आवश्यक कागदपत्रांसह आपले प्रस्ताव २ जानेवारी २०२३ पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा संकुल, सिव्हिल लाइन, चंद्रपूर येथे सादर करावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांनी केले आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos