निर्भयाच्या दोषींनी फाशी टाळण्यासाठी आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडे घेतली धाव


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / नवी दिल्ली :
निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्याकांड प्रकरणातील चारपैकी तीन दोषींनी आता फाशी टाळण्यासाठी आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडे धाव घेतलीय. अक्षय, पवन आणि विनय आंतरराष्ट्रीय कोर्टात गेले आहेत. तीनही दोषींनी आंतरराष्ट्रीय न्यायालयाला पत्र लिहून फाशी टाळण्याची किनंती केलीय.
आरोपींचे वकील ए.पी.सिंह यांच्या म्हणण्यानुसार, या खटल्याकडे जगभरातील लोकांचे लक्ष लागले आहे. परदेशातील नागरिकांना भारताच्या न्यायव्यवस्थेवर विश्वास नाही. त्यासाठी त्यांनी फाशीच्या शिक्षेविरोधात जगभरात वेगवेगळ्या संघटनांनी आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे दरवाजे ठोठावलेत.
चारही दोषींना २०  मार्च रोजी सकाळी ५. ३०  वाजता फाशी देण्यात येणार आहे. त्याआधी आपल्या जुन्या वकील वृंदा ग्रोवर यांनी आपली दिशाभूल केली असा बहाणा करीत सीबीआय चौकशीची मागणी करणाऱ्या मुकेश सिंहची याचिका आज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली होती. ही याचिका विचार करण्यायोग्यही नव्हती अशी टिप्पणी न्यायालयाने यावेळी केली.  Print


News - World | Posted : 2020-03-17


Related Photos