महत्वाच्या बातम्या

 देसाईगंज येथील सट्टा किंग याला पोलिसांनी लावली लगाम


- सट्टा व्यवसायीकांचे धाबे दनाणले  

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / देसाईगंज : पोलिसांनी आठवडाभरात भरिव कामगिरी करत सट्टा व्यवसायीकांवर लगाम कसली, असुन ३ डिसेंबरला शिवमंदिर परिसरा जवळील खुल्या आवारात सट्टा किंग रामु तिवारी यास अटक केले. सविस्तर वृत्त असे की, देसाईगंज तालुक्यातील प्रत्येक गावात या सट्टा व्यवसायीकांनी आपले प्रतिनिधी नेमले, असुन या प्रतिनिधींच्या माध्यमातुन दररोज लाखो रुपयांचा सट्टा व्यवसाय केला जातो.  या व्यवसायात अनेक करोडपतींचा समावेश असुन शहरातिल अनेक अवैद्य धंद्यात गुंतलेल्या कुख्यात लोकांसह त्यांच्या मुलांनीही आपला जम सट्टा व्यवसायात बसविल्याचे दिसुन येताच देसाईगंज पोलिसांनी या सट्टा व्यवसायीकांवर लगाम कसण्याचा बेत आठवडाभरापासुन आखला, असुन प्राप्त माहिती नुसार देसाईगंजचे पोलिस निरिक्षक महेश मेश्राम यांच्या मार्गदर्शनात उपनिरिक्षक ज्ञानेश्वर लांडे यांनी धाडसञ मोहिम सुरु करुन देसाईगंजच्या अनेक सट्टा व्यवसायीकांसह सट्टाकींग रामु तिवारी (३२) राह हनुमान वार्ड, देसाईगंज याला मोबाईलवर सट्टा पट्टी लिहितांना रंगेहाथ पकडले. या कार्यवाहित अटक केलेला आरोपी रामु तिवारी याने सट्टाचा कारोबार आरमोरीचा रोशन भैसारे याव्यक्तिसोबत मिळुन करत असल्याचे कबुल केले. महाष्ट्र जुगार अधिनियम कलम १२ अ व सहकलम १०९ भादवी नुसार गुन्ह्याची नोंद करुन रामु तिवारी याला अटक करुन पुढिल तपास उप निरिक्षक लांडे करीत असुन या कार्यवाहित उप निरिक्षक सोनम नाईक उपनिरिक्षक ईनामदार  भोपळे पोलीस शिपाई जुवारे, सोनवाने, मिरगे यांनी सहकार्य केले.





  Print






News - Gadchiroli




Related Photos