गडचिरोलीत शार्ट सर्कीटने विद्युत जनित्राला लागली आग, चप्पल दुकान जळून खाक


- विसर्जन मिरवणुकीतील फटाक्यांनी घात केल्याची चर्चा
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
शार्ट सर्कीट झाल्यामुळे विद्युत जनित्राला आग लागून जवळच असलेले चप्पल दुकान जळून खाक झाल्याची घटना काल २३ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास चामोर्शी मार्गावरील डाक कार्यालयाजवळ घडली. यामध्ये चप्पल दुकानदाराचे हजारो रूपयांचे नुकसान झाले आहे.
काल २३ सप्टेंबर रोजी गणपती विसर्जनानिमित्त मिरवणुका काढण्यात आल्या होत्या. यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येत होती. डाक कार्यालयासमोर फटाके फोडण्यात आले. यावेळी ठिणगी उडाल्यामुळे जवळच असलेल्या विद्युत जनित्राने पेट घेतला. विद्यूत जनित्राला लागूनच चप्पलचे तसेच इतर दुकाने होती. आगीने चप्पल दुकानाला कवेत घेतले यामुळे ते जळून खाक झाले असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. 
आग लागताच नगर परिषदेचे अग्नीशमन वाहन घटनास्थळी दाखल झाले. आग आटोक्यात आणली. यावेळी प्रचंड गर्दी झाली होती. विसर्जन मिरवणुक बघण्यासाठी आलेल्या नागरिकांची चांगलीच पळापळ झाली. यावेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-09-24


Related Photos