महत्वाच्या बातम्या

 बीआयटीच्या १०० विद्यार्थ्यांची मूल एमआयडीसीतील अन्नप्रक्रिया उद्योगांना भेट


विदर्भ न्यूज एक्सप्रेस  
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : बल्लारपूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (बीआयटी) येथील अन्न तंत्रज्ञान विभागाच्या वतीने ३० ऑक्टोबर रोजी मूल एमआयडीसी परिसरातील विविध अन्नप्रक्रिया उद्योगांना औद्योगिक भेट देण्यात आली. या भेटीत बी.टेक. अन्न तंत्रज्ञान विभागाच्या १०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. Maruti Soya Products, Amrut Trust आणि पंचशील राईस मिल या उद्योगांना भेट देऊन विद्यार्थ्यांनी उत्पादन प्रक्रियेची प्रत्यक्ष माहिती जाणून घेतली.

या औद्योगिक भेटीचे आयोजन भेट समन्वयक प्रा. दिव्या कोरडे यांच्या नियोजनाखाली करण्यात आले. विभागप्रमुख डॉ. प्रशांत वाटकर, प्रा. के. एम. देव, प्रा. सोनम राजभर, प्रा. लिलेश पुस्तोडे आणि प्रा. अजय दुर्गे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच शिक्षकेतर कर्मचारी नितीन आंदणकर आणि नितीन फुलझेले यांनी आयोजनासाठी सहकार्य केले.

भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी अन्नप्रक्रिया उद्योगांमधील उत्पादनाच्या विविध टप्प्यांची माहिती घेतली. कच्च्या मालाची निवड व हाताळणी, प्रक्रिया तंत्रज्ञान, गुणवत्ता नियंत्रण, पॅकेजिंग आणि साठवणूक यासह उद्योगांच्या दैनंदिन कामकाजाची प्रत्यक्ष पाहणी केली. याशिवाय उद्योग उभारणी, व्यवसाय व्यवस्थापन, उत्पादन खर्च, बाजारपेठेतील संधी आणि उद्योजकतेच्या विविध पैलूंबाबतही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

पाठ्यपुस्तकातील सैद्धांतिक ज्ञानासोबतच प्रत्यक्ष औद्योगिक अनुभव मिळावा, विद्यार्थ्यांमध्ये व्यावसायिक दृष्टिकोन विकसित व्हावा आणि भविष्यातील उद्योजकतेसाठी त्यांना प्रोत्साहन मिळावे, हा या भेटीमागील प्रमुख उद्देश होता. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना अन्नप्रक्रिया उद्योगातील प्रत्यक्ष कामकाज समजून घेण्याची संधी मिळाली. विद्यार्थ्यांनीही या भेटीत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. बीआयटीच्या अन्न तंत्रज्ञान विभागाच्या नियोजनबद्ध प्रयत्नांमुळे ही औद्योगिक भेट यशस्वीरीत्या पार पडली.





  Print






Related Photos