गावकऱ्यांनी श्रमदानातून कोयनगुडा शाळेसाठी उभारले पारंपारिक कौलारू शेड


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / भामरागड : भामरागड तालुक्यातील उपक्रमशील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोयनगुडा येथे विद्यार्थ्यांना विविध शालेय उपक्रम घेण्यासाठी शेड नसल्याने अडचण निर्माण होत होती व शाळेकडे पुरेसा निधीही नव्हता.यामुळे गावकऱ्यांनी स्वयंप्रेरणेने तब्बल आठ दिवस श्रमदान करून शाळा व्यवस्थापन समिती,माता पालक गट व सर्व गावकरी यांनी शाळेसाठी पारंपारिक इको फ्रेंडली असे कौलारू शेड तयार करून दिले.
यामुळे विद्यार्थ्यांना परिपाठ घेणे व पुस्तक वाचणे मध्यान भोजन राबवणे तसेच सायंकाळी अभ्यास करणे यासाठी या शेडचा चा वापर केला जात आहे यासाठी लागणारे संपूर्ण साहित्य गावकऱ्यांनी स्वत आणून व मेहनत घेऊन तयार करून दिले.
यासाठी तब्बल ८०० कवेलू लोकबिरादारी प्रकल्प हेमलकसा यांनी नाम मात्र शुल्क घेऊन गावकऱ्यांच्या निधीतून पुरवले.यासाठी देवराई कला ग्रामचे अध्यक्ष सुरेश पुंगाटी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्रीनिवास मडावी तसेच माजी एसएमसी अध्यक्ष वासुदेव जी हबका गावचे पाटील मनोहर जी हबका व सर्व गावकरी यांनी परिश्रम घेतले.
गावाकऱ्यांच्या प्रामाणिक श्रमदानाचे नव्याने रुजू झालेले गटशिक्षणाधिकारी भामरागड गणेश पाटील व केंद्रप्रमुख जितेंद्र कोहळे यांनी कौतुक केले. समस्त ग्रामस्थांचे आभार शाळेचे मुख्याद्यापक विनीत पद्मावार तसेच सहाय्यक शिक्षक वसंत ईष्टाम यांनी व्यक्त केला.




Petrol Price




