महत्वाच्या बातम्या

 भंडारा जिल्ह्यात सर्व प्रकारची शस्त्रे सार्वजनिक ठिकाणी बाळगण्यास बंदी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / भंडारा :  राज्य निवडणूक आयोग यांनी ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम ९ नोव्हेंबर रोजी जाहिर केलेला आहे. जिल्ह्यात आदर्श आचार सहिंतेची अंमलबजावणी करण्याची कार्यवाही सुरू आहे. ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम शांततेत पार पडावा, कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न उद्भवू नये व निवडणूक प्रक्रिया आयोगाच्या निर्देशान्वये भंडारा जिल्ह्यात सर्व प्रकारची शस्त्रे सार्वजनिक ठिकाणी बाळगण्यास बंदी घालण्यात येत आहे. सदर आदेश २८ नोव्हेंबर ते २३ डिसेंबर २०२२ रात्री १२ वाजता पर्यंत अंमलात राहील, असे आदेश जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी निर्गमीत केले आहे.
शस्त्र जमा करण्यासाठी छाननी समितीच्या बैठकीत चर्चा होवून गुन्हे दाखल असलेल्या १५ शस्त्र परवानगी धारकांना नोटीस देवून शस्त्र तात्काळ पोलीस स्टेशनला जमा करावे. निवडणुकी दरम्यान शस्त्र परवानगी धारकांवर गुन्हे दाखल होतील. त्यांचे सुध्दा शस्त्र संबंधित क्षेत्राचे पोलीस स्टेशन अधिकारी यांनी तात्काळ जमा करावी. समाजातील व्यक्ती हिंसाचारात सहभागी असल्याचे आढळून आल्यास आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यास अडचण निर्माण करत असल्याचे आढळून आल्यास व निवडणुका शांततेच्या मार्गाने पार पाडण्यास अडथळा निर्माण करण्याचे आढळून आल्यास अशा व्यक्तींचे शस्त्रे अडकवून ठेवण्यास जिल्हा प्रशासनास कोणतेही प्रतिबंध असणार नाही, असे आदेशात नमुद करण्यात आले आहे.





  Print






News - Bhandara




Related Photos