महत्वाच्या बातम्या

 आजचे दिनविशेष


३० ऑक्टोबर महत्वाच्या घटना

१९२० : सिडनी येथे कम्युनिस्ट पार्टी ऑफ ऑस्ट्रेलियाची स्थापना.

१९२८ : लाहोर येथे सायमन कमिशनचा निषेध करणार्‍या लाला लजपतराय यांच्यावर ब्रिटिश पोलिसांनी लाठीहल्ला केला.

१९४५ : भारताला संयुक्त राष्ट्रांचे (United Nations) सदस्यत्त्व मिळाले.

१९६६ : शिवाजी पार्कवर शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा झाला.

१९७३ : इस्तंबुलमधील बॉस्पोरस पूल पूर्ण झाल्यामुळे युरोप आणि आशिया जोडले गेले.

१९९५ : कॅनडातील क्‍वेबेक प्रांताने विभक्त होण्यासाठी घेतलेल्या सार्वमतात जनतेने ५०.६% विरुद्ध ४९.४% मतांनी कॅनडातच राहण्याचा निर्णय दिला.

२०१३ : सचिन तेंडुलकर आपल्या कारकिर्दीतील शेवटचा रणजी सामना खेळला.

३० ऑक्टोबर जन्म

१७३५ : अमेरिकेचे २ रे राष्ट्राध्यक्ष आणि पहिले उपराष्ट्राध्यक्ष जॉन अ‍ॅडॅम्स यांचा जन्म. (मृत्यू: ४ जुलै १८२६)

१८८७ : बंगाली साहित्यिक आणि संदेश या लहान मुलांच्या मासिकाचे संस्थापक सुकुमार रॉय यांचा जन्म. (मृत्यू: १० सप्टेंबर १९२३)

१९०९ : भारतीय भौतिकशास्त्रज्ञ डॉ. होमी जहांगीर भाभा यांचा जन्म. (मृत्यू: २४ जानेवारी १९६६)

१९३२ : भारतीय इतिहासकार आणि लेखक बरुन डी यांचा जन्म. (मृत्यू: १६ जुलै २०१३)

१९४९ : केन्द्रीय मंत्री व राज्यसभा खासदार प्रमोद महाजन यांचा जन्म. (मृत्यू: ३ मे २००६)

१९५१ : भारतीय ड्रमर आणि गीतकार त्रिलोक गुर्टू यांचा जन्म.

१९६० : अर्जेंटिनाचे फूटबॉलपटू डिएगो मॅराडोना यांचा जन्म.

१९६९ : झेक प्रजासत्ताक देशाचे ५वे पंतप्रधान स्टॅनिस्लाव ग्रॉस यांचा जन्म (मृत्यू : १६ एप्रिल २०१५)

१९२९ : भारतीय वकील आणि राजकारणी आर. एस गवई यांचा जन्म (मृत्यू : २५ जुलै २०१५)

१९१४ : लेसोथो देशाचे २रे पंतप्रधान लेबुआ जोनाथन यांचा जन्म (मृत्यू : ५ एप्रिल १९८७)

१८९५ : अमेरिकन डॉक्टर आणि फिजिओलॉजिस्ट - नोबेल पारितोषिक डिकिन्सन डब्ल्यू. रिचर्ड्स यांचा जन्म (मृत्यू : २३ फेब्रुवारी १९७३)

१८८३ : बॉब जोन्स विद्यापीठाचे संस्थापक, अमेरिकन प्रचारक बॉब जोन्स सीनियर यांचा जन्म (मृत्यू : १६ जानेवारी १९६८)

१८७८ : एनिग्मा मशीनचा शोध लावणारे जर्मन विद्युत अभियंते आर्थर शेर्बियस यांचा जन्म (मृत्यू : १३ मे १९३९)

१७३५ : अमेरिकेचे २रे राष्ट्राध्यक्ष जॉन ऍडॅम्स यांचा जाव्न्म (मृत्यू : ४ जुलै १८२६)

३० ऑक्टोबर मृत्यू

१८८३ : भारतीय तत्त्वज्ञ आणि विद्वान दयानंद सरस्वती यांचे निधन. (जन्म: १२ फेब्रुवारी १८२४)

१९७४ : गझल, दादरा आणि ठुमरी गायिका बेगम अख्तर यांचे निधन. (जन्म: ७ ऑक्टोबर १९१४)

१९९० : चित्रपटनिर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते व्ही. शांताराम यांचे निधन. (जन्म: १८ नोव्हेंबर १९०१)

१९९० : अभिनेता विनोद मेहरा यांचे निधन. (जन्म: १३ फेब्रुवारी १९४५)

१९९४ : केन्द्रीय मंत्री सरदार स्वर्ण सिंग यांचे निधन. (जन्म: १९ ऑगस्ट १९०७)

१९९६ : लेखक, पत्रकार प्रभाकर नारायण ऊर्फ भाऊ पाध्ये यांचे निधन. (जन्म: २९ नोव्हेंबर १९२६)

१९९८ : लेखक व दिग्दर्शक विश्राम बेडेकर यांचे निधन. (जन्म: १३ ऑगस्ट १९०६)

२००५ : भारतीय राजकारणी शम्मीशेर सिंह शेरी यांचे निधन.

२०११ : उद्योगपती अरविंद मफतलाल यांचे निधन. (जन्म: २७ ऑक्टोबर १९२३)

१९९७ : कॅनेडियन पटकथा लेखक आणि निर्माते सिडनी न्यूमन यांचे निधन (जन्म: १ एप्रिल १९१७)

१९९३ : भारतीय-इंग्रजी सैनिक आणि लेखक पीटर केम्प यांचे निधन (जन्म: १९ ऑगस्ट १९१३)

१९९० : अभिनेते विनोद मेहरा यांचे निधन (जन्म: १३ फेब्रुवारी १९४५

१९१० : रेड क्रॉस संस्थेचे सहसंस्थापक हेनरी डूनेंट यांचे निधन (जन्म: ८ मे १८२८)





  Print






Related Photos