भारतीय टेलिव्हिजन प्रथमच दाखवणार भारतीय लष्कराच्या रेजिमेंट सेंटर्समधील दृश्ये आणि सैनिकांशी व्यक्तिगत स्तरावर साधलेला संवाद


- यंदा स्वातंत्र्याच्या महिन्यात, तेच ते  पुन्हा - पुन्हा दाखवले जाणारे चित्रपट नकोतच.
- एपिक वाहिनीने टीव्हीवर आणले आहेत खरेखुरे नायक  
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी /  मुंबई :
एपिक वाहिनीवरील एक आगामी ओरिजिनल मालिका तुम्हाला घेऊन जाणार आहे लष्कराच्या रेजिमेंटल सेंटर्सच्या अतिसंरक्षित तटबंदीच्या आतील जगात.  ही रेजिमेंट सैनिकासाठी दुसरे कुटुंब असते आणि प्रत्येक रेजिमेंटचा स्वत:चा असा एक प्रसिद्ध इतिहास  असतो व वैभवशाली परंपराही असतात. या मालिकेतून रेजिमेंटच्या आतील गोष्टी, त्या देत असलेले प्रशिक्षण, त्यांचा वारसा आणि एका सामान्य नागरिकाचे रूपांतर सैनिकामध्ये करणाऱ्या प्रत्येक बाबीबद्दल बरेच काही बघायला मिळणार आहे. 
१६ ऑगस्टपासून प्रसारित होणारी रेजिमेंट डायरीज ही मालिका म्हणजे या रेजिमेंट्स घडवणाऱ्या आणि आयुष्यातील सर्वांत साध्या गोष्टीला- मातृभूमीवरील प्रेमाला- सर्वांत अग्रस्थानी ठेवणाऱ्या शूरवीरांना केलेला सलाम आहे. या मालिकेचा प्रत्येक भाग हृदय उचंबळवून टाकणाऱ्या, डोळ्यांच्या कडा ओलावणाऱ्या आणि भारताच्या या सर्वांत धाडसी सुपुत्रांबद्दलचा आदर आणखी वाढवणाऱ्या कहाण्यांचे दर्शन घडवणार आहे. 
यापूर्वी भारतीय लष्कराबद्दल सांगणारे अनेक माहितीपट आणि चित्रपट आले आहेत पण रेजिमेंटल सेंटर्सच्या आतमधील जगाचे दर्शन एवढ्या मोठ्या प्रमाणावर घडवले जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. लष्करातील अनेक खऱ्याखुऱ्या सैनिकांनी- यात सेवानिवृत्त झालेल्या व सध्या कार्यरत असलेल्या अशा दोन्ही प्रकारच्या सैनिकांचा समावेश होतो- त्यांच्या आयुष्याबद्दल तसेच शांततेच्या व युद्धाच्या काळात एक सैनिक म्हणून आलेल्या अनुभवांबद्दल सांगितले आहे.  
एपिक वाहिनीने या मालिकेसाठी भारतीय लष्कराचा माहिती व जनसंपर्क विभाग अर्थात एडीजी-पीआयसोबत बरेच काम केले आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक रेजिमेंट सेंटरकडे मालिकेसाठी परवानग्या मागणे, त्यासाठी आवश्यक ती प्रत्येक प्रक्रिया पूर्ण करणे आणि राष्ट्राच्या शूरवीरांना शोभेल अशा पद्धतीने त्यांच्या कहाण्या लोकांसमोर मांडणे यासाठी प्रचंड मेहनत घेतली आहे.
एपिक वाहिनीचे कंटेण्ट आणि प्रोग्रामिंग विभागाचे प्रमुख अकुल त्रिपाठी म्हणाले, “भारताचे प्रत्येक अंग साजरे करणे हे आमचे उद्दिष्ट आहे आणि भारतीय लष्कराचा समावेश होत नाही, तोवर हे साजरीकरण अपूर्णच राहिले असते. ही मालिका आमच्यासाठी अनेक मार्गांनी विशेष आहे. आम्हाला लष्कराबद्दल व्यक्तिगत स्तरावर वाटणारी कृतज्ञता आणि अभिमान व्यक्त करण्याचा हा एक मार्ग आहे. या मालिकेवर काम करणाऱ्या प्रत्येकाने आपल्या कामावर थोडेसे जास्त कष्ट घेतले आहेत आणि त्याबद्दल त्यांच्याकडे एकच सांगण्यासारखे आहे- ‘इतना तो बनता है’.”
ही साप्ताहिक मालिका दर गुरुवारी रात्री १० वाजता प्रसारित होईल. यामध्ये भारताच्या इतिहासातील विविध युद्धांच्या कथा सांगणारे आणि यातील प्रत्येक रेजिमेंटच्या योगदानाविषयी सांगणारे भाग आहेत. यात युद्धाच्या आणि युद्धासाठी केलेल्या तयारीच्या, सैनिकांना युद्धासाठी सज्ज करण्याच्या आठवणी आहेत. प्रत्येक भागात रेजिमेंटच्या विशिष्ट अशा परंपरा व संस्कृती तसेच भारतीय लष्कराच्या व्यक्तिमत्वात व वैविध्यात त्या कशा रितीने भर घालतात हे उलगडून दाखवण्यात आले आहे. 
मालिका सुरू होईल ती मद्रास इंजिनीअर्स ग्रुप रेजिमेंटवरील भागाने, त्यानंतर राजपुताना रायफल्स, सिख रेजिमेंट, जाट रेजिमेंट, मराठा लाइट इन्फंट्री यांच्यावरील भाग या मालिकेत आहेत.
स्वातंत्र्यदिनी रेजिमेंट डायरी या मालिकेचे सार सांगणारे चार मिनिटांचे ट्रेलर एपिक वाहिनीवर प्रसारित केले जाईल. स्वातंत्र्यदिनासाठी विशेष तयार करण्यात आलेल्या दिवसभराच्या कार्यक्रमाचा हे ट्रेलर भाग असेल. याशिवाय वाहिनीच्या लोकप्रिय मालिकांतील भाग, मेजर जनरल जी. डी. बक्षी यांचे भारताच्या स्वातंत्र्यानंतरच्या युद्धांबद्दलचे खिळवून ठेवणारे माहितीपट दाखवले जाणार आहेत. याशिवाय, ‘भारत की आवाज’ या मालिकेतील भारतीय नेत्यांची भारतीय राजकारण व समाजाचे स्वरूप बदलून टाकणारी वैशिष्ट्यपूर्ण भाषणेही दाखवली जाणार आहेत.  बघा रेजिमेंट डायरीज १६ ऑगस्टपासून, दर गुरुवारी, रात्री १० वाजता, केवळ एपिक वाहिनीवर.  Print


News - Rajy | Posted : 2018-08-14


Related Photos