उद्यापासून आलापल्ली येथे जिल्हास्तरीय शालेय बालक्रीडा तथा पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धाचे आयोजन


- उद्घाटक म्हणून पालकमंत्री एकनाथ शिंदे तर अध्यक्ष म्हणून जि. प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांची राहणार उपस्थिती

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत जिल्हास्तरीय शालेय बालक्रीडा व पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी क्रीडा तसेच सांस्कृतिक स्पर्धा  २०१९-२०२० चे आयोजन ५ ते ८ फेब्रुवारी २०२० रोजी या कालावधीत क्रीडा संकूल आलापल्ली येथे करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन बुधवार, ५ फेब्रुवारी २०२० रोजी सकाळी १० वाजता राज्याचे नगरविकास, सार्वजनिक बांधकाम सार्व. उपक्रम मंत्री  तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते  होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गडचिरोली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजय कंकडालवार तर विशेष अतिथी म्हणून गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते, विधान परिषद सदस्य नागो गाणार, विधान परिषद सदस्य डाॅ. रामदास आंबटकर, विधान परिषद सदस्य अनिल सोले, गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डाॅ. देवराव होळी, आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार क्रिष्णा गजबे, अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार धर्मरावबाबा आत्राम, जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा शिक्षण व क्रीडा समिती सभापती मनोहर पोरेटी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला विशेष निमंत्रित अतिथी म्हणून जिल्हाधिकारी दीपक सिंगला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. विजय राठोड, पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी डाॅ. इंदुराणी जाखड, अहेरीचे सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी राहूल गुप्ता, अहेरीचे अप्पर पोलिस अधीक्षक मजिब कलवजिया, अहेरीचे उपविभागीय पोलिस अधिकारी बजरंग देसाई, अहेरीचे तहसीलदार ओंकार ओतारी, अहेरीचे पोलिस निरीक्षक प्रवीण डांगे, जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती रंजिता कोडापे, महिला व बालकल्याण सभापती रोशनी पारधी, सभापती युद्धिीष्ठीर बिश्वास, सभापती रमेश बारसागडे व सर्व जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य लाभणार आहेत.
या स्पर्धांचा समारोपीय व बक्षिस वितरण समारंभ शनिवार, ८ फेब्रुवारी २०२० रोजी दुपारी ३ वाजता होणार आहे. यावेळी बक्षिस वितरक म्हणून जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार तर समारंभाध्यक्ष म्हणून जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा शिक्षण व क्रीडा समिती सभापती मनोहर पोरेटी राहणार आहेत. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद सभापती, सदस्य, पंचायत समिती सभापती, सदस्य, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला जास्तीत जास्त नागरिक व कर्मचारयांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी प्राथमिक यांनी केले आहे.
जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांच्या आयोजनासाठी जि. प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी घेतला पुढाकार
मागील दोन वर्षांपासून जिल्हास्तरीय शालेय बालक्रीडा तथा पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा घेण्यात येत नव्हत्या. त्यामुळे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी व विद्याथ्र्यांचा हिरमोड होत होता. याकडे जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी गांभिर्याने लक्ष देवून जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांच्या आयोजनासाठी पुढाकार घेतला व जिल्हा परिषदेच्या माध्यमातून निधीची तरतूद केली. त्यांच्या पुढाकारातूनच आलापल्ली येथे क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असल्याने त्यांचे जिल्ह्यात सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.  Print


News - Gadchiroli | Posted : 2020-02-04


Related Photos