महत्वाच्या बातम्या

 दादालोरा खिडकीच्या माध्यमातुन पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण घेतलेल्या युवक-युवतींचा निरोप समारंभाचा कार्यक्रम संपन्न


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : गडचिरोली जिल्हयातील नक्षलग्रस्त व दुर्गम -अतिदुर्गम भागातील बेरोजगार युवक युवतींना नोकरीची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने गडचिरोली पोलीस दादालारा खिडकी व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, भामरागड व अहेरी यांचे संयुक्त विदयमाने जिल्ह्यातील युवक-युवतींना पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण देवून त्यांना नोकरी मिळविणेकरीता आत्मनिर्भर होण्याच्या उद्देशाने पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण घेतलेल्या युवक-युवतींचा निरोप समारंभ कार्यक्रम आज ३० नोव्हेंबर २०२२ रोजी एकलव्य धाम, पोलीस पार पाडण्यात आले. मुख्यालय, गडचिरोली येथे सदर पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण ०१ नोव्हेंबर २०२२ ते ३० नोव्हेंबर २०२२ पर्यंत एकूण ३० दिवसांचे निवासी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. प्रशिक्षणात एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, भामरागड व अहेरीचे अधिनस्त अहेरी, भामरागड, एटापल्ली, सिरोंचा व मुलचेरा तालुक्यातील सहभागी झालेल्या १८२ उमेदवारांना पोलीस भरतीच्या अनुषंगाने मैदानी चाचणी व लेखी परीक्षा याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. आतापर्यंत घेण्यात आलेल्या पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणामध्ये गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील रहीवासी असलेल्या एकुण १०६२ युवक-युवतींनी आपला सहभाग नोंदवला असून, प्रशिक्षणा दरम्यान सर्व उमेदवारांना गडचिरोली पोलीस दलाचेवतीने प्रशिक्षणाकरीता शुज, टि-शर्ट, लोअर, पुस्तके, नोटबुक्स, नोटपेंड व पेन इत्यादी साहित्य मोफत वितरीत करण्यात आले.
सदर निरोप समारंभ कार्यक्रमास पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण घेतलेले १८२ उमेदवार हजर होते. प्रशिक्षणादरम्यान अंतीम लेखी व मैदानी चाचणीत प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांक मिळविलेल्या उमेदवारांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उमेदवारांनी पोलीस भरतीमध्ये यशस्वी होण्याचे मनोगत व्यक्त केले तसेच पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण मिळत असल्याबाबत गडचिरोली पोलीस दलाचे आभार मानले. आतापर्यंत गडचिरोली पोलीस प्रशासनाकडुन रोजगार व स्वयंरोजगार मेळाव्याद्वारे पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून सुरक्षा रक्षक, नर्सिंग असिस्टंट, हॉस्पीटॅलीटी, ऑटोमोबाईल, इलेक्ट्रीशिअन, प्लम्बींग, वेल्डींग, जनरल ड्यूटी असिस्टंट फील्ड ऑफीसर व व्हीएलई, सेल्समैन असे एकुण २८६६ युवक/युवतीना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच कृषी तंत्रज्ञान व व्यवस्थापन
(आत्मा) सोनापुर, गडचिरोली व बीओआय आरसेटी गडचिरोली यांच्या मार्फत ब्युटीपार्लर, मत्स्यपालन, कुकुटपालन, बदक पालन, वराहपालन, शेळीपालन, शिवणकला, मधुमक्षिका पालन, फोटोग्राफी, भाजीपाला लागवड, पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण, टू व्हिलर दुरुस्ती, फास्ट फुड, पापड लोणचे, दु/फोर व्हिलर प्रशिक्षण, एमएससीआयटी, कराटे प्रशिक्षण असे एकुण ३८९५५ युवक-युवतींना स्वयंरोजगार प्रशिक्षण देण्यात आले आहे. च्या निरोप समारंभ प्रसंगी पोलीस अधीक्षक नीलोत्पल सा. यांनी उपस्थित युवक-युवतींना नोकरीच्या व रोजगाराच्या ज्या संधी आहेत, त्याच्या शोधात असणे गरजेचे आहे. असे सांगुन या जिल्ह्याची नक्षलग्रस्त म्हणून असलेली ओळख नाहीशी करण्याची क्षमता तुमच्यामध्ये आहे असे मत व्यक्त केले तसेच येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये सहभागी होवून कठोर मेहनत व सराव करून यश मिळविण्याकरीता प्रशिक्षणार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) अनुज तारे, अंकित (माप्रसे.), प्रकल्प अधिकारी ए.आ.वि. प्र. अहेरी, शुभम गुप्ता, प्रकल्प अधिकारी ए.आ.वि.प्र. नामरागड अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिता अपर पोलीस अधीक्षक, अहेरी यतिश देशमुख सा. उपस्थित होते..
पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणाच्या यशस्वीतेसाठी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, पोस्टे / उपपोस्टे / पोमकेचे सर्व प्रभारी अधिकारी, कमांडो ट्रेनिंग सेंटर, किटाळी चे सर्व प्रशिक्षक तसेच नागरीकृती शाखेचे प्रभारी अधिकारी सपोनि महादेव शेलार, पोउपनि धनंजय पाटील व सर्व पोलीस अंमलदार यानी विशेष परिश्रम घेतले.               





  Print






News - Gadchiroli




Related Photos