अजित पवार पुन्हा होणार उपमुख्यमंत्री : राजभवनाकडून यादी जाहीर


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / मुंबई : महाविकास आघाडी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आज होणार आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात २५ कॅबिनेट मंत्री व १० राज्यमंत्री शपथ घेणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. तर, शिवसेना नेते आदित्य ठाकरे हे कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेणार आहे. महाराष्ट्राच्या नव्या मंत्रिमंडळात अनुभवी मंत्र्यांसह आणि तरुण मंत्र्यांचाही समावेश असणार आहे.
राज्यात तीन पक्षांचे सरकार आल्यामुळे प्रत्येक पक्षाच्या वाटेला मोजकीच खाती आली आहेत. त्यातही सरकारमध्ये मंत्रिपदासाठी अनेकजण इच्छुक आहेत. त्यामुळे तिन्ही पक्षांच्या नेत्यांना मंत्रिमंडळ विस्तारासाठी मंत्र्यांची यादी जाहीर करताना तारेवरची कसरत करावी लागली.
शिवसेने कडून आदित्य ठाकरे, गुलाबराव पाटील,संजय राठोड , दादा भुसे, अनिल परब, शंभुराजे देसाई, उदय सामंत, संदीपान घुमरे, शंकरराव गडाख हे मंत्रिपदाची शपथ घेणार तर राज्यमंत्री म्हणून अब्दुल सत्तार, बच्चू कडू हे शपथ घेतील .
राष्ट्रवादी काँग्रेस कडून अजित पवार (उपमुख्यमंत्री),नवाब मलिक,दिलीप वळसे पाटील,हसन मुश्रीफ,बाळासाहेब पाटील,अनिल देशमुख,जितेंद्र आव्हाड,धनंजय मुंडे, राजेश टोपे, डॉ. राजेंद्र शिंगणे हे मंत्री पदाची शपथ घेतील तर राज्यमंत्री पदाची शपथ दत्तात्रय भरणे,आदिती तटकरे,प्राजक्त तनपुरे,संजय बनसोडे,राजेंद्र पाटील यड्रावकर घेणार आहेत.
काँग्रेसकडून अशोक चव्हाण,के सी पडवी,विजय वडेट्टीवार,अमित देशमुख,सुनिल केदार,यशोमती ठाकूर,वर्षा गायकवाड,अस्लम शेख मंत्री पदाची शपथ घेतील तर राज्यमंत्री पदाची शपथ सतेज(बंटी) पाटील,विश्वजीत कदम घेतील.
News - Rajy | Posted : 2019-12-30