महत्वाच्या बातम्या

 कर्मवीर विद्यालय तथा कला कनिष्ठ महाविद्यालय वासाळा येथे संविधान दिन साजरा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / आरमोरी : कर्मवीर विद्यालय तथा कला कनिष्ठ महाविद्यालय वासाळा येथे संविधान दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य सिद्धार्थ शेंडे उपस्थित  होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे पर्यवेक्षक एस. जी. मेश्राम, सदानंद कुथे, निकुरे, खोब्रागडे, गोंडाणे मंचावर उपस्थित होते. या निमित्त प्रमुख वक्ते यांनी संविधानाचे विद्यार्थ्यांना महत्त्व सांगितले. यावेळी यशस्वी कुले, समृद्धी मेश्राम, प्रबुद्ध मेश्राम, आदित्य जनबंधू, रुचिता धंदरे, छकुली राऊत, आनंद बांबोळे, रिया धंदरे, हिताकशी राऊत, तेजस्विनी राऊत, संचिता खोब्रागडे, आराध्या नारनवरे, जानवी मेश्राम, काजल धंदरे या विद्यार्थ्यांची भाषणे झाली. कार्यक्रमाचे संचालन मोहितकर यांनी केले. प्रास्ताविक यशस्वी कुळे, तर आभार कुणाल मेश्राम याने केले. शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचारी कार्यक्रमाला उपस्थित होते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos