महत्वाच्या बातम्या

 घराच्या चार भिंतीआड जुगाराचा डाव! रामनगर पोलिसांचा छापा : ११ जण जाळ्यात, १२ लाखांचा मुद्देमाल जप्त


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : घराच्या चार भिंतीआड सुरू असलेल्या जुगाराच्या डावावर रामनगर पोलिसांनी धडक कारवाई करत ११ जणांना जागीच पकडले. समतानगर, तुकुम येथील एका घराच्या पहिल्या मजल्यावरील खोलीत सुरू असलेल्या या जुगारावर पोलिसांनी छापा टाकून रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य असा एकूण १२ लाख ६ हजार ४४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. २० ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४.५० वाजताच्या सुमारास झालेल्या या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

समतानगर, तुकुम येथील राजेंद्र सोमाजी रायपुरे याच्या राहत्या घरात जुगार खेळला जात असल्याची गोपनीय माहिती रामनगर पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी संबंधित ठिकाणी छापा टाकला असता, तेथे जुगार खेळणारे आणि खेळविणारे ११ जण आढळून आले. पोलिसांनी सर्वांना जागीच पकडून जुगारासाठी वापरण्यात येणारे साहित्य आणि रोख रक्कम जप्त केली.

या कारवाईत शैलेश गंगाधर पोडल्लीवार ५० वर्षे  जिल्हा परिषद शिक्षक, रा. छत्रपती नगर, चंद्रपूर; रंजु कालिदास दुर्योधन ५४ वर्षे ऑटोचालक, रा. वैद्यनगर, मेजर गेटजवळ, चंद्रपूर; इंद्रजीत सोमाजी रायपुरे ५८ वर्षे रा. तुकडोजी नगर, तुकुम, चंद्रपूर; राजेंद्र सोमाजी रायपुरे ५३ वर्षे रा. एसटी वर्कशॉप, तुकुम, चंद्रपूर राजेश्वर पोचम दुर्गे ४८ वर्षे वेकोलि कर्मचारी, रा. भिवापूर वॉर्ड, गुरनुलेवाडी, चंद्रपूर ललित ऊर्फ क्षितीज बाकाराम देशपांडे ४८ वर्षे खासगी नोकरी, रा. छत्रपती नगर, तुकुम, चंद्रपूर अनिल यशवंत बनकर ६५ वर्षे वेकोलि निवृत्त कर्मचारी, रा. सिनाळा, ता. जि. चंद्रपूर; किशोर वसंता पारखी ४९ वर्षे वेकोलि कर्मचारी, रा. इंदिरानगर, हनुमान मंदिराजवळ, वॉर्ड क्रमांक ३, चंद्रपूर; सुनील रामचंद्र नगराळे ६३ वर्षे वेकोलि निवृत्त कर्मचारी, रा. एसबीआय कॉलनी, तुकुम, चंद्रपूर; संजू खुशाल दुर्योधन ३८ वर्षे वेकोलि कर्मचारी, रा. वेकोलि कॉलनी, क्वार्टर क्रमांक एम-१३८, शक्तीनगर, दुर्गापूर, चंद्रपूर; आणि विजय गजानन रायपुरे ५५ वर्षे  वेकोलि कर्मचारी, रा. समता कॉलनी, तुकुम, चंद्रपूर, यांच्यावर कारवाई करण्यात आली.

विविध व्यवसायांत कार्यरत असलेल्या व्यक्तींचा या प्रकरणात समावेश असल्याने या कारवाईची चर्चा होत आहे. घरासारख्या खासगी ठिकाणी सुरू असलेल्या जुगाराच्या डावावर पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे अवैध जुगाराच्या व्यवहारांवर नियंत्रण ठेवण्याच्या पोलिसांच्या प्रयत्नांना बळ मिळाले आहे. या प्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ४ व ५ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर काकडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांचा नेतृत्वात सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी नागवे, सहायक पोलीस निरीक्षक हनुमान उगले, पोलीस उपनिरीक्षक कृष्णा दराडे यांच्यासह पोलीस अंमलदार आनंद खरात, प्रकाश बलकी, रामप्रसाद नैताम, बाबा नैताम, रविकुमार ढेंगळे, जितेंद्र आकरे, मनिषा मोरे, मंगेश शेंडे, पंकज ठोंबरे, प्रकाश मडावी, संदीप गेडाम, सुरेश कोरवार, पंकज पोंदे, सूरज शेडमाके आणि ब्ल्युटी साखरे यांनी केले.





  Print






Related Photos