महत्वाच्या बातम्या

 जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा नवेगाव (रै.) येथील विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षेत गगन भरारी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / चामोर्शी  : जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा नवेगाव (रै.) येथील तीन विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेत यशस्वी कामगिरी बजावलेली आहे. 

मागील सत्रापासून शाळेमध्ये घे भरारी, वेध नवोदय/ शिष्यवृत्तीचा हा उपक्रम शाळेमध्ये राबविण्यात येत आहे. त्याचीच फलश्रुती म्हणून मागील सत्रात पाच विद्यार्थ्यांची नवोदय परीक्षेत निवड झालेली होती आणि हेच यश कायम ठेवत यावर्षी सुद्धा कु कोमल गव्हारे, मानवी टिकले, श्राव्या मेश्राम या तीन विद्यार्थ्यांनी जवाहर नवोदय विद्यालय घोट येथे आपला प्रवेश निश्चित केलेला आहे. 

तसेच  नुकताच लागलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत शाळेतील विद्यार्थिनी कोमल गव्हारे, मानवी टिकले या पात्र ठरलेल्या आहेत. शाळेतील वर्षभर चालणारे गुणवत्तापूर्ण उपक्रम, स्पर्धा परीक्षेचे जादा सराव वर्ग, सराव चाचणीचे आयोजन, माता पालकांचा सक्रिय सहभाग इत्यादी उपक्रमामुळे विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेत यश संपादन केलेले आहे. 

विद्यार्थ्यांच्या या यशाचे कौतुक शाळेचे मुख्याध्यापक तानाजी भांडेकर, पांडुरंग उडान, आशिष येल्लेवार, प्रवीण टोंगे, शरद दोहतरे, कविता गोंगले, प्राजक्ता मेश्राम, शैला तुरे यांनी विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक केलेले आहे. शाळेने मागील वर्षापासून यशाला गवसणी घालत असल्याबद्दल कुनघाडा (रै.) केंद्राचे केंद्रप्रमुख गोमासे, पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी मस्के व शाळा व्यवस्थापन समिती नवेगावरै यांनी शाळेतील शिक्षकांचे विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos