स्टेट बँक ऑफ इंडियाची पेन्शनधारकांसाठी महत्त्वाची सूचना, ३० नोव्हेंबर पर्यंत सादर करावे लागणार जिवंत असल्याचे प्रमाणपत्र


वृत्तसंस्था / नवीदिल्ली :  देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) सर्व पेन्शनधारकांसाठी एक महत्त्वाची सूचना जारी केली आहे. ज्यांचे निवृत्ती वेतन एसबीआयच्या खात्यात जमा होते अशा पेन्शनधारकांना  ३०  नोव्हेंबर  पर्यंत आपलं लाइफ सर्टिफिकेट (जिवंत असल्याचं प्रमाणपत्र)  जमा करण्यास बँकेकडून सांगण्यात आलं आहे.
एसबीआयच्या कोणत्याही शाखेत हे लाइफ सर्टिफिकेट किंवा जिवंत असल्याचं प्रमाणपत्र जमा केले जाऊ शकते. तसेच, जवळच्या आधार सेंटर आणि कॉमन सर्विस सेंटरवर हे जमा करता येईल. दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात पेंशनरला आपल्या बँकेत जाऊन रजिस्टरमध्ये स्वाक्षरी करुन आपण जिवंत असल्याचे प्रमाण द्यावे लागते. जर हे सर्टिफिकेट जमा केले नाही तर पेन्शनधारक आपल्या बँक खात्यातून पेन्शन काढू शकणार नाहीत किंवा त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागेल असं एसबीआयकडून ट्विटरद्वारे स्पष्ट करण्यात आलं आहे.  Print


News - World | Posted : 2019-11-03


Related Photos