महत्वाच्या बातम्या

 मतदारांना मतदार माहिती चिठ्ठीचे वाटप


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : 08 वर्धा लोकसभा मतदार संघासाठी 26 एप्रिल 2024 रोजी मतदान होणार आहे. या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत मतदारांना सुलभ सुविधा व्हावी तसेच मतदानाची टक्केवारी वाढावी, याउद्देशाने वर्धा लोकसभा मतदार संघात केंद्रस्तरीय अधिकारी (बी.एल.ओ.) यांच्या माध्यमातून मतदार माहिती चिठ्ठीचे वाटप करण्याच्या सूचना निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिल्या होत्या, त्याअनुषंगाने मतदार माहिती चिठ्ठीचे वाटप करण्यात आले आहे.

23 एप्रिल 2024 पर्यंत जिल्ह्यातील हिंगणघाट विधानसभा मतदार संघात 2 लाख 50 हजार 910, आर्वी विधानसभा मतदार संघात 2 लाख 56 हजार 835, वर्धा विधानसभा मतदार संघात 2 लाख 22 हजार 590 व देवळी विधानसभा मतदार संघात 2 लाख 39 हजार 915 मतदारांना मतदार माहिती चिठ्ठींचे वाटप करण्यात आले आहे.

भारत निवडणूक आयोगातर्फे मतदारांना मतदार माहिती चिठ्ठी (Voter Information Slip ) वाटप करण्यात येते. या मतदार चिठ्ठीमध्ये मतदाराचे नाव, परिसर, केंद्र कोणते, यादी क्रमांक, भाग क्रमांक, रुम क्रमांक इत्यादी आवश्यक माहिती आहे.





  Print






News - Wardha




Related Photos