महत्वाच्या बातम्या

 प्रशिक्षणार्थी महिला पोलिसांनी अनुभवली पोलीस आयुक्तांमधली संवेदनशीलता


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : निवडणूकीसाठी बंदोबस्तावर असलेल्या दोन प्रशिक्षणार्थी महिला पोलिसांना पोलीस आयुक्तांमधील संवेदनशीलता अनुभविण्यास आली. कर्तव्यावर असताना काहीशा भेदरलेल्या अवस्थेतील या महिला पोलिसांशी पोलीस आयुक्तांनी आत्मियतेने संवाद साधून त्यांच्यातील आत्मविश्वास वाढविला. या कृतीमुळे पोलीस वर्तुळात सकारात्मक संदेश गेला आहे.

मतदानाच्या दिवशी जागोजागी पोलिसांचा बंदोबस्त होता. त्याच दिवशी रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपुरात मुक्कामाला होते. त्यामुळे पोलीस यंत्रणा मतदानानंतर त्या बंदोबस्तात लागली. प्रीती मिंधे व पूजा सहारे या दोघींची ड्युटी सिव्हिल लाईन्स परिसरात लागली होती. नवीन अनुभव असल्याने त्या काहीशा भेदरलेल्या होत्या. परंतु तरीदेखील त्या शिस्तीत उभ्या होत्या. त्या मार्गाने पोलीस आयुक्त डॉ.रविंद्रकुमार सिंगल हे जात असताना त्यांचे लक्ष त्यांच्याकडे गेले व त्यांनी गाडी थांबविण्याची सूचना केली. पोलीस आयुक्तांना पाहताच दोघीही काहीशा गडबडल्या, मात्र त्यांनी लगेच सॅल्युट केला.

पोलीस आयुक्तांनी त्यांची विचारपूस केली व त्या दोघीही प्रतिकूल परिस्थितीतून इथपर्यंत पोहोचल्याचे त्यांना कळाले. एकीचे वडील शेतकरी तर दुसरीचे रिक्षा चालक आहेत. नवीन असूनदेखील न थकता प्रामाणिकपणे त्या कर्तव्यावर होत्या. पोलीस आयुक्तांनी त्यांना निवासस्थानाच्या परिसरात बोलविले व त्यांच्याशी संवाद साधला. पोलीस आयुक्त आमच्याशी बोलत होते तेव्हा जणू आमचे वडिलच बोलत आहेत असे वाटत होते, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.





  Print






News - Nagpur




Related Photos