महत्वाच्या बातम्या

 आजचे दिनविशेष


१८ एप्रिल महत्वाच्या घटना

१३३६: हरिहर व बुक्‍क यांनी विजयनगरच्या हिंदू राज्याची स्थापना केली.

१७०३: औरंगजेबाने सिंहगड ताब्यात घेतला.

१७२०: शाहू छत्रपती यांच्याकडून पहिले बाजीराव पेशवे यांना पेशवाईची वस्त्रे मिळाली.

१८३१: युुनिव्हर्सिटी ऑफ अलाबामा ची स्थापना झाली.

१८५३: मुंबईहून ठाण्यापर्यंत नियमित रेल्वे सेवा सुरू झाली.

१८९८: जुलमी प्लेग अधिकारी रँड याचा खून करणारे दामोदर चापेकर यांना फाशी.

१९१२: टायटॅनिक मधील वाचलेले ७०५ प्रवासी घेऊन कार्पेथिया हे जहाज न्यूयॉर्कला पोचले.

१९२३: पुण्याच्या शिवाजी मंदिरात शिवजयंतीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यातील पहिल्या संगमरवरी अर्धपुतळ्याची स्थापना करण्यात आली.

१९२४: सायमन व शूस्टर यांनी पहिले शब्दकोड्यांचे पुस्तक प्रकाशित केले.

१९३०: क्रांतिकारकांनी चितगाव येथील शस्त्रागार लुटले.

१९३०: आज काहीही बातमी नाही असे बी. बी. सी. या नभोवाणी केंद्रावरुन सांगण्यात आले.

१९३६: पेशव्यांची राजधानी असणार्‍या पुण्यातील शनिवारवाडा पुरातत्व विभागाकडे सुपूर्त करण्यात आला.

१९५०: आंध्र प्रदेशातील पोचमपल्ली खेड्यातील भूदानाने विनोबा भावे यांची भूदान चळवळ सुरू झाली.

१९५४: गामल अब्दल नासर याने इजिप्तची सत्ता ताब्यात घेतली.

१९७१: एअर इंडियाचे पहिले बोईंग ७४७ जंबो जेट विमान सम्राट अशोक हे सांताक्रूझ विमानतळावर दाखल झाले.

२००१: भूसंलग्न उपग्रह प्रक्षेपक GSLV- D1 वाहकाचे श्रीहरिकोटा तळावरून यशस्वी प्रक्षेपण झाले.

१८ एप्रिल जन्म

१७७४: सवाई माधवराव पेशवा यांचा पुरंदर किल्ल्यावर जन्म. (मृत्यू: २७ ऑक्टोबर १७९५)

१८५८: स्त्रीशिक्षण आणि विधवा विवाह यातील कर्ते समाजसुधारक महर्षी धोंडो केशव कर्वे यांचा जन्म. (मृत्यू: ९ नोव्हेंबर १९६२ – मुरुड)

१९१६: हिंदी व मराठीतील चरित्र अभिनेत्री ललिता पवार यांचा जन्म. (मृत्यू: २४ फेब्रुवारी १९९८)

१९५८: वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू माल्कम मार्शल यांचा जन्म. (मृत्यू: ४ नोव्हेंबर १९९९)

१९६२: हिंदी चित्रपट अभिनेत्री पूनम धिल्लन यांचा जन्म.

१९९१: डॉ. वृषाली करी यांचा जन्म.

१८ एप्रिल मृत्यू

१८५९: स्वातंत्रवीर सेनापती रामचंद्र पांडुरंग तथा तात्या टोपे यांचे निधन.

१८९८: महाराष्ट्रातील सशस्त्र क्रांतिकारकांचे शिरोमणी दामोदर हरी चापेकर यांना फाशीची शिक्षा. (जन्म: २४ जून १८६९)

१९४५: व्हॅक्यूम ट्यूब चे शोधक जॉन एम्ब्रोस फ्लेमिंग यांचे निधन. (जन्म: २९ नोव्हेंबर १८४९)

१९५५: जर्मन भौतिकशास्त्रज्ञ अल्बर्ट आइनस्टाइन यांचे निधन.

१९६६: योगविद्येचे पुरस्कर्ते व शारीरिक शिक्षणतज्ञ जगन्नाथ गणेश गुणे तथा स्वामी कुवलयानंद यांचे निधन. (जन्म: ३० ऑगस्ट १८८३ – डभई, गुजराथ)

१९७२: विख्यात कायदेपंडित आणि धर्मशास्त्राचे अभ्यासक, महामहोपाध्याय, भारतरत्‍न डॉ. पांडुरंग वामन काणे यांचे निधन. (जन्म: ७ मे १८८०)

१९९५: पंचांगकर्ते आणि ज्योतिषशास्त्राचे व्यासंगी अभ्यासक पंडित धुंडिराजशास्त्री ऊर्फ अण्णा लक्ष्मण दाते यांचे निधन.

१९९९: आंतरराष्ट्रीय ख्यातीचे छायाचित्रकार रघुवीर सिंह यांचे निधन. (जन्म: २२ ऑक्टोबर १९४२ – जयपूर)

२००२: महाराष्ट्र विधान सभेचे अध्यक्ष शरद दिघे यांचे निधन.

२००२: नॉर्वेजियन दर्यावर्दी संशोधक थोर हेअरडल यांचे निधन. (जन्म: ६ ऑक्टोबर १९१४)





  Print






News - todayspecialdays




Related Photos