महत्वाच्या बातम्या

 नवरगांव ते गिरगांव मार्गाची अवस्था खड्यामुळे बिकट : प्रवाशाना करावी लागते तारेवरची कसरत संबधित विभागाचे दुर्लक्ष


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / सिंदेवाही : नवरगांव ते गिरगांव हा 3 किमी अंतराचा रस्ता पूर्ण पणे खराब असुन जागोजागी डांबरीकरण उखळुन गीट्टी बाहेर निघुन मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. हा मार्ग  गेल्या 5  वर्षापूर्वी हया रस्ताची डांबरीकरण केले होते. या रसत्याची अवस्था खूपच दयनीय झाली आहे. हा रस्ता सध्यास्थीतीत प्रवाशाना प्रवास करताना खुपच त्रासदायक असुन प्रवाशाना तारेवरची कसरत करून व अपघाताला आमत्रंन देवून या सदर रस्त्यान प्रवास करावा लागतो आहे.

हा गिरगांव मार्ग नागपूर महामार्गाला जोडला जातो. तर गिरगाव- नवरगाव मार्ग सिंदेवाही, चिमूर मागाला जोडला जातो. या मार्गाची अवस्था खड्यांमुळे बिकट झाली आहे. या मार्गावर ऑटो, मोटार, बस, सायकल, शाळाकरी मुल, प्रवासासाठी उपयोगी आहे. सदर रस्त्यानी नवरगांव येथील शासकीय कामासाठी, बाजार, कॉलेज जाणे येणे करतात 2 वर्षापासुन या रस्त्याला डांबर उखळुन जागोजागी खड्डे पडले आहे. मोठ मोठ्या खड्यांमुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.

अनेक किरकोळ अपघात होऊन दुचाकीस्वार जखमी झाल्याच्या घटनाही या मागांवर पडल्या आहेत. हा रस्ता खुपच त्रासदायक असुन प्रवाशाना मोठ्या प्रमाणात प्रवास करतांना तारेवरची कसरत व जीव मुठीत घालुन अपघाताला आमत्रंन देवून या रस्त्याने प्रवास करावा लागतो तरी संबधीत विभागांनी त्वरीत या सर्व सामान्य जनतेच्या गंभीर समस्येकडे लक्ष द्यावे व सदर रस्ता प्रवासा योग्य बनवून जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी येथील जनतेनी केली आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos