जीवाश्म पार्कमुळे सिरोंचाचे नाव जागतिक पातळीवर कोरले जाणार, वडधम येथील जीवाश्म जगात सर्वात अतिप्राचीन


- आयर्लंड मधील आंतरराष्ट्रीय परिषदेत शिक्कामोर्तब 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
  सिरोंचा येथील जंगलात भारत  आणि अमेरिकेतील जीवाश्म वैज्ञानिकांनी तपासणी केली. या तपासणीत वैज्ञानिकांना ज्युरासीक काळातील डायनासोर,मत्स्य, वृक्षांचे अवशेष सापडले होते. आता ही जीवाश्म जगातील सर्व जीवाश्मापेक्षा अतिप्राचीन असल्याच्या बाबीवर  जगभरातील ३०० शास्त्रज्ञांनी आंतरराष्ट्रीय परिषदेत शिक्कामोर्तब केले आहे. यामुळे  सिरोंचाचे नाव जागतिक पातळीवर कोरले जाणार असून आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन स्थळ म्हणून विकसित होण्यास वाव मिळाला आहे. 
आयर्लंड मधील डब्लिन शहरात आंतरराष्ट्रीय बैली  बॉटनिकल परिषदेत जगभरातील ३०० शास्त्रज्ञ सहभागी झाले होते.यामध्ये भारतातील ११ शास्त्रज्ञांनी दक्खनच्या पठारावर आढळलेली जीवाश्म अतिप्राचीन असल्याचा प्रबंध सादर केला होता. ही बाब आता जगातील शास्त्रज्ञांनी मान्य केली आहे. यामुळे सिरोंचातील जीवाश्म सिरोंचाला नक्कीच जागतिक स्तरावर पोहचविणार असल्याचे बोलल्या जात आहे. 
सिरोंचामध्ये सापडलेले जीवाश्म हे कोटा फॉर्मेशनचे असल्याचे वैज्ञानिकांनी सांगितले असून सापडलेले अवशेष पायाचे बोट, मनगट, गळ्याचा भाग इत्यादींचे असल्याचे मत अमेरिकेतील वैज्ञानिकांनी व्यक्त केले . त्यांचे वय १५० ते १६० दशलक्ष वर्षे असू शकते असेही सांगितले आहे. तसेच सिरोंचा येथील जंगलात २०१५ सालीसुद्धा वैज्ञानिकांच्या मदतीने डायनासोर, मत्स्य व झाडांचे अवशेष जमा करण्यात आले होते. त्यानंतर वडधम येथे फॉसील पार्क तयार करण्यात आले. आंतरराष्ट्रीय स्तरावर संशोधन व्हावे म्हणून २०१८ मध्ये अमेरिकेतल्या नावाजलेल्या जीवाश्म संशोधकांना भारतीय  संशोधकांच्या मार्फत कोटा फॉर्मेशन मधील जिवाश्मांचा अभ्यास करण्यासाठी बोलाविण्यात आले. आंतरराष्ट्रीय स्तरावर संशोधन व्हावे म्हणून २०१८ मध्ये अमेरिकेतल्या नावाजलेल्या जीवाश्म संशोधकांना हिंदुस्थानी संशोधकांच्या मार्फत कोटा फॉर्मेशनमधील जीवाश्मांच्या अभ्यास करण्यासाठी बोलाविण्यात आले.
 एकाच जागेवर वनस्पती, प्राणी आणि मासे यांचे जीवाश्म हिंदुस्थानमध्ये फक्त सिरोंचा येथेच दिसून येतात.   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-09-01


Related Photos