महायुतीचे उमेदवार खासदार अशोक नेते यांच्या प्रचारार्थ आमदार डॉ. देवराव होळी यांनी साधला जनसंवाद
- भाजपा पदाधिकारी कार्यकर्त्यांसोबत बैठक तर नागरिकांसोबत प्रत्यक्ष भेटीगाठी
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवराव होळी यांनी इंदाळा बूथावर दौरा करीत भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार अशोकभाऊ नेते यांना निवडून देण्याचे आवाहन जनतेला केले. यावेळी त्यांनी भारतीय जनता पार्टीचे बूथ प्रमुख व प्रमुख भाजपा पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली.
यावेळी प्रामुख्याने तालुका अध्यक्ष विलास भांडेकर, सरपंच संजय पा. निखारे, रनछोड कलंत्री तालुका महामंत्री बंडू झाडे, अशोक चौधरी, हरिदास निकोडे, बाबुराव कालेवार, चरण जेंगठे, रवींद्र देवेवार, ईश्वर चौधरी, शैलेश कोटरंगे, अमित आगरे, गणपत शेंडे, गजानन गुरनुले दिलीप शेंडे, संदेश जेंगठे, वसंत चौधरी, खुशाल जेंगठे, पांडुरंग जेंगठे, अंबादास कावळे, ज्ञानेश्वर जेंगठे, मल्लाजी काकेवार, राजेश्वर आगेवार पांडुरंग जेंगठे उपस्थित होते.
News - Gadchiroli