महत्वाच्या बातम्या

 मुख्य निवडणूक निरीक्षक अभय नंदन अंबास्था यांनी घेतला आर्वी विधानसभेचा आढावा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पूर्वतयारीला वेग आला असून ०८ वर्धा लोकसभा मतदार संघाचे मुख्य निवडणूक निरीक्षक अभय नंदन अंबास्था यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालय, आर्वी येथे भेट देऊन विधानसभा मतदार संघाच्या निवडणूक कामाचे नियोजन तसेच कामकाजाचा आढावा घेतला व विविध कक्षांची पाहणी केली.

यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी विश्वास शिरसाट, कारंजा तहसीलदार ऐश्वार्या गिरी, आष्टीच्या तहसीलदार हंसा मोहाने, समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त तथा नोडल अधिकारी प्रसाद कुळकर्णी, संपर्क अधिकारी दिपक वाघ यांच्यासह विविध नोडल अधिकारी यांची उपस्थिती होती.

२६ एप्रिल २०२४ रोजी होणाऱ्या मतदानामध्ये जास्तीत जास्त मतदारांनी सहभागी व्हावे, यासाठी जनजागृतीपर विविध उपक्रम राबविण्यात आले असल्याची माहिती शिरसाट यांनी दिली. स्वीपअंतर्गत मतदार जनजागृतीचे कार्यक्रम सतत सुरू ठेवावे, अशा सूचना मुख्य निवडणूक निरीक्षकांनी यावेळी दिल्या.

आर्वी विधानसभा क्षेत्रातील एकूण मतदार, नवमतदार, दिव्यांग मतदार तसेच ८५ वर्षावरील मतदारांना देण्यात येणाऱ्या सुविधा, टपाली मतपत्रिका सुविधा, स्ट्राँगरूम, एक खिडकी परवानगी कक्ष, आचार संहिता कक्ष, निवडणूक खर्च नियंत्रण कक्ष, तक्रार निवारण कक्ष तसेच निवडणुकीच्या कामकाजासाठी आवश्यक असलेले मनुष्यबळ आदींचा सविस्तर आढावा मुख्य निवडणूक निरीक्षक अभय नंदन अंबास्था यांनी यावेळी घेतला.





  Print






News - Wardha




Related Photos