महत्वाच्या बातम्या

 निवडणूक प्रक्रियेदरम्यान माहितीकरीता विविध ॲप उपलब्ध


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / भंडारा : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने लोकसभा मतदार संघात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. या निवडणूक कालावधीत जर आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्यास सर्वसामान्य मतदार, नागरिकांना आता निवडणूक आयोगाकडे तक्रार करता येणार आहे. त्यासाठी भारत निवडणूक आयोगाने C-Vigil App (सतर्कता मोबाईल ॲप ) विकसित केले असून यावर तक्रार करण्यास हे ॲप मोबाईलमध्ये डाऊनलोड करणे आवश्यक आहे.  

त्याचप्रमाणे मतदानाची टक्केवारी पाहण्याकरिता Votar Turn Out app, मतदारांच्या मदतीकरिता Voter help link व Saksham App., मतदारांना आपल्या उमेदवारांची संपूर्ण माहिती मिळण्याकरिता Know Your Candidate App तसेच मतदारांसंबंधी माहितीकरिता Voter portal App तयार करण्यात आले आहे. ११-भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघ अंतर्गत मतदारांनी मा.निवडणूक आयोग यांनी तयार केलेल्या या विविध प्रणालींचा वापर करण्यास हे ॲप मोबाईलमध्ये डाऊनलोड करण्याचे आवाहन जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी तथा नोडल अधिकारी आयटी संदीप लोखंडे यांनी केले आहे.      





  Print






News - Bhandara




Related Photos