महत्वाच्या बातम्या

 निवडणूक खर्चावर देखरेखीसाठी जिल्हा तक्रार समिती गठीत


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार लोकसभा सार्वत्रिक निवडणूक खर्चावर देखरेखीसाठी जिल्हा तक्रार समिती गठीत करण्यात आली आहे.

या समितीच्या अध्यक्ष जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा असून नागपूर व रामटेक मतदार संघाचे खर्च संनियंत्रण कक्षाचे नोडल अधिकारी विलीन खडसे व सिमा नन्होरे  सदस्य सचिव आहेत. वरिष्ठ कोषागार अधिकारी समितीचे सदस्य आहेत.

तक्रारीच्या अनुषंगाने रामटेक लोकसभा मतदार संघासाठी नोडल अधिकारी सिमा नन्होरे मो.क्र. 9404834043 व नागपूर लोकसभा मतदार संघासाठी नोडल अधिकारी विलीन खडसे मो.क्र. 8446247686 यांच्याशी  नागरिकांनी संपर्क साधावा.





  Print






News - Nagpur




Related Photos