महत्वाच्या बातम्या

 क्रांतिवीर बिरसा मुंडा जयंती निमित्य पोलीस स्टेशन भामरागड येथे विविध स्पर्धांचे आयोजन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस

तालुका प्रतिनिधी / भामरागड : तालुक्यातील गावे नक्षलदृष्टया अतीसंवेदनशील व दुर्गम भागात असुन येथील आदिवासी युवकांच्या अंगी असलेल्या विविध कलागुणांना वाव देण्याकरीता तसेच आदिवासी संस्कृतीचे जतन होण्याच्या उद्देशाने पोलीस स्टेशन भामरागड येथे पोलीस अधिक्षक गडचिरोली निलोत्पल, अपर पोलीस अधिक्षक अनुज तारे, अपर पोलीस अधिक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधिक्षक यतिश देशमुख, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस दादालोरा खिडकी अंतर्गत क्रांतिवीर बिरसा मुंडा जयंती निमित्याने १५ नोव्हेंबर २०२२ ते १८ नोव्हेंबर २०२२ रोजी पोलीस स्टेशन भामरागडच्या भव्य पटांगणावर चार दिवशीय व्हॉलीबॉल, हस्तकला व आदिवासी रेला नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

क्रांतिवीर बिरसा मुंडा जंयती कार्यक्रम प्रसंगी सीआरपीएफ ३७ बटालीयनचे द्वितीय कमान अधिकारी शिवकुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे, तसेच पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण रासकर, एसआरपीएफ ग्रुप ०२ चे पोलीस निरीक्षक जंबे, सिआरपीएफ- ३७ बटालीयनचे पोलीस निरीक्षक राजुकुमार, भामरागडचे व्यापारी संघटना अध्यक्ष- संतोष बडगे, व सलीम शेख, जोगा उसेंडी, आदिवासी सेवक शबरबेग मोघल व भामरागड मधील प्रतिष्टीत नागरीक उपस्थित होते. क्रांतिवीर बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. क्रांतिवीर बिरसा मुंडा जयंती दरम्यान उपस्थित असलेल्या नागरीक व स्पर्धकांना नितीन गणापुरे यांनी बिरसा मुंडा यांच्या जिवनावर माहिती देवून स्पर्धकांना मार्गदर्शन केले. सदर पोस्टे हद्दीतील क्रांतिवीर बिरसा मुंडा व्हॉलीबॉल स्पर्धेकरीता १४ संघानी, विरांगणा राणी दुर्गावती हस्तकला स्पर्धेकरीता ०६ संघानी व आदिवासी समुह रेला नृत्य स्पर्धेसाठी १० संघानी सहभाग नोंदविला होता व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये प्रथम- भामरागड, द्वितीय- कियर व तृतीय- हितापाडी संघाने विजेत्या ठरल्या, हस्तकला स्पर्धेमध्ये प्रथम- नरेंद्र मडावी, द्वित्तीय- सुरेश पुंगाटी व तृत्तीय- सिमरण रॉय या स्पर्धकानी विजेत्या ठरल्या व रेला नृत्य स्पर्धेमध्ये प्रथम- कोयनगुडा, द्वितीय- हेमलकसा व तृतीय- भामरागड पथकाने विजेत्या ठरल्या, प्रत्येक स्पर्धेमध्ये सहभाग झालेल्या प्रत्येक खेडाळु व स्पर्धकाने आपल्या अंगी असलेल्या सुप्त गुणांचा सादरीकरण केले, व्हॉलीबॉल, हस्तकला व रेला नृत्य स्पर्धामध्ये विजेता ठरलेल्या संघ, पथक तसेच स्पर्धकांना प्रथम, द्वित्तीय व तृतीय रोख बक्षीस व प्रशस्तीपत्र देवून गौरविण्यात आले. तसेच प्रत्येक स्पर्धामध्ये सहभागी झालेल्या संघ, पथक व स्पर्धकांना प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात आले. चार दिवसात पार पडलेल्या व्हॉलीबॉल, हस्तकला व रेला नृत्य स्पर्धा दरम्यान पंच म्हणून उत्कृष्ठ कामगिरी बजाविलेल्या अनिल ठवरे, जयदेव मडावी, संजय खंडाळकर व स्वीटी कुडे शिक्षक यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

क्रांतिवीर बिरसा मुंडा जयंती निमित्याने घेण्यात आलेल्या व्हॉलीबॉल, हस्तकला व रेला नृत्य स्पर्धा पार पाडण्याकरीता पोउपनि/अभिषेक जंगमवार, पोउपनि / संकेत नानोटी, पोउपनि / राहुल लोखंडे पोउपनि विशाखा म्हेत्रे व सर्व पोलीस स्टेशन येथील अंमलदार तसेच एसआरपीएफचे अंमलदार या सर्वांनी अथक परिश्रम घेतले.





  Print






News - Gadchiroli




Related Photos