चंद्रपूर मंडळातील ८८ हजार ग्राहकांनी आॅनलाईन पेमेंटच्या माध्यमातून आॅगस्ट महिण्यात केला १० कोटी ७६ लाखांचा भरणा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर 
: वीज बिलांचा  भरणा करण्यासाठी महावितरणद्वारा ग्राहकांना  आॅनलाईन पेमेंट, माबाईल अॅप, एनी टाईम पेमेंट मशिन्स यासारख्या ग्राहकाभिमुख सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.   या सुविधांना ग्राहकांचा  प्रतिसादही लाभत असल्याचे चित्र आहे. महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळांतर्गत चंद्रपूर मंडलातील ८८ हजार ८५ ग्राहकांनी  आॅनलाईन पेमेंटच्या माध्यमातून  आॅगस्ट महिण्यात १० कोटी ७६ लाख ५४ हजार ९१७ रुपयांचा भरणा केला आहे. तर पुर्वींच्या एप्रिल मध्ये ४ कोटी ७० लाख, मे मध्ये ९  कोटी ५८ लाख , जून मध्ये ६ कोटी ५० लाख व जुलै महिण्यात ११ कोटी ६८ लाखांचा वीजबिल भरणा केला आहे.
१ एप्रिल २०१८ ते  ३१ आॅगस्ट २०१८ दरम्यान त्यांनी हा वीजबिलांचा भरणा केला असून घरगुती, वाणिज्यिक, औदयोगिक, पाणिपुरवठा योजना, सरकारी कार्यालये यांनी वीज बिलांचा भरणा करण्यासाठी हया आॅनलाईन वीजबिल भरण्याच्या प्रणालीचा उपयोग केला आहे. या सर्व ग्राहकांनी   रांगेत न लागता उपलब्ध तंत्रज्ञानाच्या माध्यमातून स्वतःचा वेळ वाचवित वेळेवर वीजबिल भरून महावितरणला सहकार्य केले आहे.
 चंद्रपूर मंडलातील- बल्लारशा  विभागातील २१ हजार ८६४ ग्राहकांनी  २ कोटी २३ लाख रूपये, चंद्रपूर  विभागातील ३५ हजार ४९५ ग्राहकांनी ५ कोटी ३७ लाख ७५ हजार तर वरोरा विभागातील ३० हजार ७२६ ग्राहकांनी ३ कोटी १५ लाख ७८ हजार ८५७ रूपयांचा भरणा  आॅगस्ट महिण्यात केला आहे.   Print


News - Chandrapur | Posted : 2018-09-06


Related Photos