महत्वाच्या बातम्या

 जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा कुनघाडा रै. येथे मतदान जागृती उपक्रम


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / चामोर्शी : भारत हा लोकशाही प्रधान देश असून भारतात निवडणू‌कीचे मोठे पर्व दर पाच वर्षानी उत्साहात साजरे केले जाते. मतदान प्रक्रिया ही मतदारांसाठी गर्वांचा विषय असतो, प्रत्येक भारतीय माणसाला आपण मतदार असल्याचा अभिमान आहे. हि भारतीय लोकशाही दिवसेंदिवस अधिक प्रगल्भ होत असल्याचे द्योतक आहे. 

२०२४ हे साल भारतीय लोकशाहीच्या दृष्टीने मतदान आणि निवडणूक यांचे आहे. गडचिरोली चिमूर लोकसभा मतदार संघात १९ एप्रिलला मतदान होणार आहे. या पार्श्वभू‌मीवर जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा कुनघाडा रै येथे  विद्यार्थ्यांची साखळी निर्माण करून  मतदारांना मोठ्या प्रमाणात मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले. विद्यार्थ्यांची साखळी निर्माण करून मतदान करा असा संदेश देण्यात आला. 

याप्रसंगी शाळेचे उश्रेमुअ तावाडे, पद‌शिक्षिका गीता शेंडे, प्रमोदे बोरसरे, गुरुदास सोनटक्के, विजय दुधबावरे, अंजली तंगडपल्लीवार, अनिल दुर्गे, अभिषेक लोखंडे, राहुल वडेट्टीवार, जगदिश वैरागडे, भुंजगराव कोडाप, गावकरी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos