महत्वाच्या बातम्या

 लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ नामनिर्देशनपत्र दाखल करण्यासाठी येणाऱ्या व्यक्तींबाबत आदेश निर्गमित


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यानुसार नागपूर लोकसभा मतदारसंघ निवडणूक अधिकारी कार्यालयात नामनिर्देशनपत्र दाखल करण्यासाठी येणाऱ्या व्यक्तींसाठी पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंघल यांनी आदेश निर्गमित केले आहेत.

या आदेशानुसार उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल करते वेळेस निवडणूक निर्णय अधिकारी अधिकारी यांच्या कार्यालयात येणाऱ्या वाहनांच्या ताफ्यामध्ये तीनपेक्षा जास्त मोटारगाड्या, वाहने यांचा नसावा. तसेच नामनिर्देशनपत्र दाखल करतेवेळी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या दालनात पाच व्यक्ती उपस्थित राहतील. या व्यतिरिक्त कोणालाही निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयाच्या १०० मीटर परिसरात, तसेच दालनात प्रवेश दिला जाणार नाही. निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयात नामनिर्देशनपत्र दाखल करतेवेळी कार्यालयाच्या परिसरात मिरवणूक, सभा घेणे, कोणत्याही प्रकारच्या घोषणा देणे, वाद्य वाजविणे किंवा गाणी म्हणणे आणि कोणत्याही प्रकारचा निवडणूक प्रचार करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. 

या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती भारतीय दंडविधान १८६० चे कलम १८८ अन्वये शिक्षेस पात्र राहील. ३ एप्रिल‍ २०२४ पर्यंत हे आदेश लागू राहणार आहेत, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.





  Print






News - Nagpur




Related Photos