महत्वाच्या बातम्या

 नगर परिषद तर्फे कर्तृत्ववान महिला व युवतींचा सत्कार


- जागतिक महिला दिनानिमित्य कार्यक्रम

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / भंडारा : जागतिक महिला दिनानिमित्य नगरपरिषद भंडारा तर्फे विविध क्षेत्रातील कर्तुत्वान महिलांचा विद्यार्थी यांचा सत्कार करण्यात आला.

महिला- बालकल्याण समिती व दीनदयाळ अंत्योदय योजना, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्य महिला मेळाव्यात विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भंडारा नगर परिषदचे प्रशासक तथा मुख्याधिकारी करणकुमार चव्हाण होते. कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा माहिती अधिकारी शैलजा वाघ यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्याधिकारी अश्विनी चव्हाण, बालरोगतज्ज्ञ डॉ. सुचिता वाघमारे, स्त्री रोगतज्ञ डॉ. पुनीत शेंडे, दंतचिकित्सक डॉ. पुनम पशीने, नेत्ररोगतज्ञ डॉ. विशाखा जिभकाटे, नगर परिषदेचे प्रकल्प व्यवस्थापक प्रवीण पडोळे, भंडारा नगर परिषदेच्या लेखा विभाग प्रमुख रशिका लांजेवार, इंग्लेश्वरी कन्सरे, व्यवस्थापक प्रकाश बांते उपस्थित होते.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दिप प्रज्वलित करून महिला मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. मान्यवरांचे स्वागत गीताने व स्मृती चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

महिला हीच स्वतःची नायिका आहे. मात्र ती स्वतः ला वेळ देत नाही. महिलांनी मानसिक, बौद्धिक व कौशल्यावर भर द्यावे. नगर परिषदेच्या दिनदयाळ अंत्योदय योजना- राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान अंतर्गत महिलांना विभागाकडून स्वतः आर्थिक सक्षम केले जात आहे. सिंधूताई सपकाळ, झाशीची राणी, अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले सौंदर्य कसे असते म्हणजे ज्ञान सकारात्मक ठेवा. जीगर चांगले ठेवा म्हणजे आयुष्य हिरोईन सारखे होईल. आपल्या आरोग्याची सदैव काळजी घ्यावी. असे मत जिल्हा माहिती अधिकारी शैलजा वाघ यांनी व्यक्त केले.

माणसाचा अविभाज्य घटक म्हणजे डोळे आहेत. ओम शांती म्हणल्याने मन प्रसन्न व मंगलमय दिवस जात असते. पुरुष प्रधान संस्कृती म्हणजे सुध्दा महिला विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत आहेत. त्यात अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्याकरिता मानसिक दृष्टीकोन बदलावा लागेल. आध्यात्मिक व मानसिक बदल घडून आणणे आवश्यक आहे. जिवनात जिंकण्यासाठी भुतकाळ बद्दल विचार करायचा नाही.

त्यात चांगली व वाईट, बुध्दी, मन सदैव जागृत ठेवावे. जे करायचे आहे ते चांगले किंवा वाईट याकरिता काही मिनिटे डोळे बंद करून आपल्या अंतर्मनाला प्रश्न विचारला तर योग्य दिशा मिळत असते. मनात कुठलीही भिंती न ठेवता योग्य कार्य करावे. तसेच शासनाच्या विविध योजनाच्या माध्यमातून डोळ्यांची तपासणी व उपचार करून घ्यावे असे मत डॉ. विशाखा जिभकाटे यांनी केले.
एक महिला म्हणून शरिर मौखिक आरोग्याची काळजी घ्यावी. त्याकरीता तंबाखू जन्य सुपारी किंवा कोणत्याही पदार्थाचे सेवन करू नये. त्यामुळे कॅन्सर सारखे आजार होत असतात, असे मार्गदर्शन दंतचिकित्सक डॉ. पुनम पशीने यांनी केले.

कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी आंतरराष्ट्रीय महिला दिन व देशातील थोर समाजसेविका यांच्या जीवनावर आधारित विविध मार्मिक उदाहरण देऊन मार्गदर्शन केले.

त्याप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आट्यापाट्या या क्रिडा क्षेत्रात उतुंग भरारी मारणारी प्राची केशव चटप, धनिक्षा कावळे, जान्हवी बावनकुळे, प्रिन्सु उपरिकर, गुणवंत विद्यार्थिनी, सामाजिक व उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या महिला शारदा गिऱ्हेपुंजे व महिला बचत गटाच्या पदाधिकारी तसेच प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी महिलांचा सत्कार करण्यात आला.

त्यादरम्यान आरोग्य शिबिरात उपस्थित महिलांची शुगर, बीपी व थायराईड तपासणी करण्यात आली होती. तसेच महिला बचत गटाच्या महिला पदाधिकारी-कर्मचारी, स्त्रीशक्तीचा गजर, जागर, अभिव्यक्ती व मार्गदर्शन तसेच महिला बचत गटाच्या पदाधिकारी व सदस्यांनी वेशभुषा, रांगोळी स्पर्धा तसेच सांस्कृतिक कार्यक्रमात व्यक्तिगत, समुह नृत्यांच्या माध्यमातून रसिकांचे मने जिंकली. भारतातील थोर समाजसुधारक महिलांचे पात्र हुबेहूब महिला बचत गटांच्या सदस्यांनी सादर केले.
सत्कार मृर्तीना स्मृती चिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. तसेच त्यांच्या पुढील यशाकरिता शुभेच्छा दिल्या.

उपस्थित मान्यवरांनी अमृततुल्य मार्गदर्शनाचे बाळकडू पाजले असुन कोटी कोटी अमृताचे दोन थेंब महिलांना मिळत राहो अशा प्रकारे शुभेच्छा दिल्या. महिला मेळाव्यात जवळपास एक हजार दोनशे च्यावर शहरातील बचत गटांच्या पदाधिकारी, सदस्या उपस्थित होत्या.

कार्यक्रमात नगर परिषदेचे प्रकल्प व्यवस्थापक प्रवीण पडोळे यांनी दीनदयाळ अंत्योदय योजना, राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान, नगर परिषदेच्या माध्यमातून शासनाच्या नियमानुसार उत्कृष्ट, जनशक्ती वस्तीस्तर संघटना बचत गटाच्या माध्यमातून महिलांच्या कुटुंबाचा आर्थिक स्तर उंचावणे व समाजात महिलांना आत्मनिर्भर करून गरूड झेप घेण्यासाठी सातत्याने मार्गदर्शन केले जाते असे सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधुरी खोब्रागडे व प्रास्ताविक रंजना साखरकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार नंदा कावळे मानले.      

कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता  नगर परिषदेच्या समूह संघटिका रेखा आगलावे, उषा लांजेवार, शहर स्तर संघाच्या पदाधिकारी समिता भंडारी, प्रियंका सेलोकर, सीमा साखरकर, प्रणाली नागुलवार, सुनंदा कुंभलकर, रंजना गौरी, नुतन कुरंजेकर, ज्योती राऊत, बेबी वाडीभस्मे, राजश्री गोस्वामी, सूर्यकांता वाडीभस्मे, कोमल बारापात्रे, सुनिता बावनकर, माधुरी खोब्रागडे, सारिका रामटेके, गीता नागपुरे, मुक्ता बोरकर, कोमल सोनटक्के, अंकिता साखरकर, नगर परिषदचे सीएलसी व्यवस्थाप गुरूदेव शेंडे व शहरातील बचत गटातील सर्व महिला तसेच आरोग्य विभागाचे राहुल नेवारे, वर्षा बान्ते, सिमा वासनिक, शालिनी टांगले सह इत्यादींनी सहकार्य केले.





  Print






News - Bhandara




Related Photos