अपक्षांच्या संख्येसोबत मुक्त चिन्हांची संख्याही वाढली, अनेकांना ढोबळी मिरची, आलं, आईस्क्रीम, पाव, ब्रेडटोस्ट, कलिंगड मिळणार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : 
महाराष्ट्र आणि हरियाणा राज्यात विधानसभा निवडणुकीचा महासंग्राम सुरु आहे. निवडणुकीत  राष्ट्रीय, राज्यस्तरीय विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांसह  निवडणूक लढविण्यासाठी अपक्ष उमेदवारांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे मुक्त चिन्हांची संख्यादेखील वाढली आहे. आता १९७ चिन्हे अपक्ष उमेदवारांना दिली जाणार असून काही चिन्हे अतिशय गमतीशीर आहेत.  
अपक्षांसाठी फ्लॉवर, भोपळी मिरची, आलं, आईस्क्रीम, पाव, ब्रेडटोस्ट, कलिंगड  इतकेच नव्हे तर चपला बूट, मोजे अशी   मुक्त चिन्हे निवडणूक  आयोगाने उपलब्ध करून दिले आहेत.
महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ जागांसाठी २१ ऑक्टोबर रोजी निवडणूक होत आहे.  ४ ऑक्टोबर अर्ज भरण्याची शेवटची तारीख असून ७  ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील, याच दिवशी निवडणुकीतील उमेदवारांचे चित्र स्पष्ट होणार आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, बहुजन समाज पार्टी आणि तृणमूल काँग्रेस हे सात राष्ट्रीय पक्ष आहेत. शिवसेना आणि मनसे हे दोन पक्ष राज्य पातळीवरील आहेत. राष्ट्रीय व राज्य पातळीवरील या सर्व पक्षांना निवडणूक आयोगाने चिन्ह दिले आहेत. या पक्षांतर्फे निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना त्या - त्या पक्षांचे चिन्ह प्रदान केले जातील. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवारांची वाढती संख्या लक्षात घेऊन केंद्रीय निवडणूक आयोगाने १९७ मुक्त चिन्हे उपलब्ध करून दिली आहेत. त्यामध्ये पाव, बिस्किट, केक, ब्रेडटोस्ट अशा बेकरी वस्तूंचा चिन्हासाठी वापर केला आहे.  

निवडणूक आयोगाने ठरविलेली चिन्हे 

  नरसाळे, तंबू, हेल्मेट, लायटर, एसी, सायकल पंप, कॅमेरा, कोट, दरवाजाची घंटी, हेलिकॉप्टर, कडी, भुईमूग, करणी थापी, सेफ्टी पिन, टाचणी, स्पॅनर पाना, तंबू, टायर्स, लोकर व सुई, कपाट, दुर्बीण, कॅन, नारळ बाग, दरवाजा हँडल, ऊस शेतकरी, हेल्मेट, पत्रपेटी, नास्पती, जेवण ताट, करवत, स्टेप्लर, भालाफेक, व्हॅक्यूम क्लीनर, सफरचंद, बिस्किट, सिमला मिरची, कलर ट्रे आणि ब्रश, ड्रील मशिन, गॅस सिलिंडर, हॉकी आणि बॉल, लायटर, मटार, प्लेट स्टँड, शाळेचे दप्तर, स्टेथोस्कोप, टीलर, व्हायोलिन, ऑटोरिक्षा, फळा, गालिचा, संगणक, डंबेल्स, गॅस शेगडी, वाळूचे घड्याळ, लुडो, पेनड्राइव्ह, हंडी, कात्री, स्टुल, टॉफीज, चालण्याची काठी, बेबी वॉकर, मनुष्य व शीडयुक्त नाव, कॅरम बोर्ड, संगणक माऊस, कानातील रिंगा, भेटवस्तू, आइस्क्रीम, जेवणाचा डबा, पेनाची निब ७ किरणांसह, कुकर, शिवणयंत्र, स्टॅम्प्स, चिमटा, भिंतीची खुंटी, फुगा, पेटी, फ्लॉवर, खाट, विजेचा खांब, आलं, पाणी गरम करण्याचा रॉड, तुतारी वाजवणारा माणूस, पेन स्टँड, पंचिंग मशिन, जहाज, झोपाळा, टूथब्रश, पाकीट, बांगड्या, पाव, सीसीटीव्ही कॅमेरा, क्रेन, लिफाफा, काचेचा पेला, इस्त्री, काडेपेटी, पेन्सिल डबा, रेझर, बूट, स्विच बोर्ड, टूथपेस्ट, अक्रोड, फळांची टोपली, ब्रेड  Print


News - Rajy | Posted : 2019-10-02


Related Photos