महत्वाच्या बातम्या

 वडसा-आरमोरी मार्गावर बसची ट्रॅक्टरला जोरदार धडक : बस चालकासह ट्रॅक्टर चालक जखमी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

शहर प्रतिनिधी / देसाईगंज : बसने ट्रॅक्टरला जोरदार धडक दिल्याने बस चालकासह ट्रॅक्टर चालक जखमी झाला. ही घटना गुरुवारी रात्री साडेसातच्या सुमारास आरमोरी-वडसा मार्गावरील आयटीआयजवळ घडली. हा अपघात एवढा भीषण होता की बस-ट्रॅक्टरच्या पुढील भागाचे नुकसान झाले आहे. या घटनेमुळे या मार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला. 

मिळालेल्या माहितीनुसार, राज्य परिवहन महामंडळाची बस आरमोरीहून वडसा रस्त्याने प्रवासी घेऊन जात होती. यादरम्यान धानाच्या पोत्याने भरलेले ट्रॅक्टर वडसा येथे जात होते. यादरम्यान आरमोरी वडसा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेजवळ ट्रॅक्टरची जोरदार धडक झाली. यामध्ये ट्रॅक्टर मुख्य रस्त्यावर पलटी झाला. त्यामुळे भाताची पोती रस्त्यावर विखुरली. ट्रॅक्टर चालकासह बस चालक जखमी झाला. हा अपघात एवढा भीषण होता की बसच्या पुढील भागाचे नुकसान झाले. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच जखमींना उपचारासाठी दाखल करण्यात आले.





  Print






News - Gadchiroli




Related Photos