महत्वाच्या बातम्या

  थकबाकी असलेल्या मालमत्तेचा १४ मार्च रोजी जाहीर लिलाव


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार कौटुंबिक न्यायालय यवतमाळ याच्या निर्देशान्वये दीपक नारायण वराटकर यांच्याकडील जमीन महसुलाची थकबाकी म्हणुन १ लाख ९ हजार ५०० रुपये इतकी रक्कम त्यांचे वडील नारायण वराटकर यांच्या मालकीच्या मालमत्तेची विक्री करुन रक्कम वसुल करण्याकरीता मालमत्तेची लिलावाव्दारे १४ मार्च रोजी करण्यात येणार आहे. यासाठी सदर मालमत्ता खरेदी करावयाची असल्यास तहसिल कार्यालय येथे अनामत रक्कम जमा करावी, असे आवाहन नायब तहसिलदार डॉ. एस.आर. पाराजे यांनी केले आहे.

दीपक नारायण वराटकर यांच्याकडील नारायण वराटकर यांच्या मालकीच्या मौजा आकोली येथील शेत सर्वे क्रमांक ६९/३ आराजी ३.७० हे.आर पैकी ०.६१ हे आर च्या जमिनीचा जाहिर लिलाव ग्रामपंचायत कार्यालय आकोली येथे १४ मार्च रोजी करण्यात येणार आहे.सदर मालमत्तेची अपसेट मुल्य २ लाख ६२ हजार ५१३ रुपये जमिनीच्या मुल्यांकनाच्या आधारे निश्चित करण्यात आले आहे, असे तहसिल कार्यालय देवळी यांनी कळविले आहे.





  Print






News - Wardha




Related Photos