महत्वाच्या बातम्या

 उद्यापासून जलरथाद्वारे भंडारा जिल्ह्यात जल जीवन मिशन, स्वच्छ भारत मिशन व जल युक्त शिवार योजनेची जनजागृती


- जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, जिल्हा परिषद अध्यक्ष. गंगाधर जिभकाटे, मुख्य कार्यकारी अधिकारी समीर एम. कुर्तकोटी दाखविणार जलरथाला हिरवी झेंडी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / भंडारा : जल जीवन मिशन, स्वच्छ भारत मिशन (ग्रा.) टप्पा २ व जल युक्त शिवार योजनेची ग्रामस्तरावर व्यापक जनजागृती करण्याच्या उदेश्याने उद्या २८ फेब्रुवारी २०२४ पासून भंडारा जिल्ह्यात जलरथाचा शुभारंभ करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर आणि जिल्हा परिषदेचे अध्यक्ष  गंगाधरजी जिभकाटे, मुख्य कार्यकारी अधिकारी, समीर एम. कुर्तकोटी यांचे हस्ते यांचे हस्ते जलरथाला जिल्हाधिकारी कार्यालयात हिरवी झेंडी दाखवून जलरथ गावस्तरावर मार्गस्थ होतील.

स्थानिक नागरिकांच्या सहभागातून ग्रामीण भागात पाणी पुरवठा व्हावा या उद्देशाने केंद्र व राज्य शासनाच्या वतीने जल जीवन मिशन कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरू आहे. पाण्याचे विश्वासार्ह स्त्रोत निर्माण करणे, विद्यमान स्त्रोतांचे बळकटीकरण करण्यावर या अभियानात लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे.

या सोबतच राज्य दुष्काळमुक्त करण्याच्या उद्देशाने राज्य शासनामार्फत अभियान राबविले जात आहे. पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत दूषित होण्यापासून रोखण्यासाठी स्वच्छतेचे महत्व ही अनन्य साधारण आहे. केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्या तसेच राज्यशासनाच्या माध्यमातून जल जीवन मिशन, स्वच्छ भारत मिशन तसेच राज्य शासनाच्या माध्यमातून जलयुक्त शिवार योजना (स्त्रोत बळकटीकरण) अशा विविध योजना कार्यरत आहेत.

या योजनांची व्यापक जनजागृती  जिल्हाभरात जलरथाचे माध्यमातून करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी नऊ वाजता जलरथाला  जिल्हाधिकारी मा. योगेश कुंभेजकर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष गंगाधर जिभकाटे, मुख्य कार्यकारी अधिकारी समीर एम. कुर्तकोटी यांचे हस्ते हिरवी झेंडी दाखवून जलरथाद्वारे प्रचार प्रसिध्दीचा शुभांरभ होईल. यावेळी जिल्ह्यातील लोकप्रिनिधी, अधिकारी, कर्मचाऱ्यांची उपस्थिती राहील.

जल जीवन मिशन, स्वच्छ भारत मिशन व जलयुक्त शिवार योजनेची व्यापक प्रचार व प्रसिध्दी गावस्तरावर व्हावी या करीता गट विकास अधिकारी यांचे नेतृत्वात तालुकास्तरावर जलरथाचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्हाभरात जलरथाचे आयोजनासाठी प्रकल्प संचालक (जल जीवन मिशन) एम.एस. चव्हाण यांचे नेतृत्वात नियोजन करण्यात आले आहे. जलरथ हा राज्य शासनाने नियुक्त केलेल्या एजन्सीच्या मदतीने जिल्ह्यात प्रचार प्रसिध्दी करणार असून  प्रकल्प संचालक, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन, जिल्हा परिषद भंडारा हे जिल्हा नोडल अधिकारी म्हणून काम पाहतील.

तालुकास्तरीय नोडल अधिकारी म्हणून गट विकास अधिकारी यांचेकडे जबाबदारी सोपविण्यात आली असून विस्तार अधिकारी (ग्रा.पं.) यांचेकडे तालुकानिहाय जलरथ उपक्रमाचे आयोजन, व्यवस्थापन व मार्ग निश्चित करुन प्रत्येक गावनिहाय नियोजन करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

तालुकास्तरावर  लोकप्रतिनिधी व अधिकारी यांचे उपस्थितीत जलरथाचे उदघाटन करुन जलरथ गावाज जावून जल जीवन मिशन, स्वच्छ भारत मिशन, जल युक्त शिवार योजनेची माहिती जिंगल्स, पोस्टर, पत्रकाद्वारे नागरिकांना दिली जाणार आहे.





  Print






News - Bhandara




Related Photos