महत्वाच्या बातम्या

 ६ ऑक्टोबरला बालेवाडी पुणे येथे नैसर्गिक शेती विषयी कार्यशाळा : युटयुब चॅनेलवर उपलब्ध


- जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

 प्रतिनिधी / नागपूर : कृषी विभागामार्फत 6 ऑक्टोबर रोजी बालेवाडी क्रीडा संकुल पुणे येथे नैसर्गिक शेती विषयी कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेस गुजरात राज्याचे राज्यपाल आचार्य देवव्रत हे मार्गदर्शन करणार आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, कृषी मंत्री अब्दुल सत्तार व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे उपस्थित राहणार आहेत.

राज्यभरातून सुमारे 2 हजार शेतकरी या कार्यशाळेस उपस्थित राहणार असून दुपारच्या तांत्रिक सत्रात तज्ञांचे मार्गदर्शन तसेच महाराष्ट्रात नैसर्गिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचे अनुभव कथन ऐकायला मिळणार आहे. या कार्यशाळेला जोडून नैसर्गिक शेतीबाबत एका प्रदर्शनाचेही आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यशाळेचे थेट प्रक्षेपण कृषी विभागाच्या http://www.youtube.com/c/Agriculture  DepartmentGoM या युटयुब चॅनलवर  करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपणाची व्यवस्था ग्रामपंचायत कार्यालय, शासकीय कार्यालय, कृषी विज्ञान केंद्र, कृषी संशोधन संस्था आदी ठिकाणी करण्यात येणार आहे. या कार्यशाळेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे.





  Print






News - Nagpur




Related Photos