महत्वाच्या बातम्या

 आज रमाई आवास घरकुल योजना शिबिराचे आयोजन


- झोननिहाय स्वीकारण्यात येतील अर्ज

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : नागपूर महानगरपालिका क्षेत्रातील अनुसुचित जाती व नवबौध्द घटकांतील पात्र लाभार्थ्यांसाठी रमाई आवास घरकुल योजना (शहरी) अंतर्गत शिबिराचे आयोजन उद्या २७ फेब्रुवारी रोजी करण्यात आले आहे. सकाळी ११  ते ४ या वेळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन दीक्षाभूमी येथे शिबिर होणार आहे.

घरकुल योजनेंतर्गत ज्या लाभार्थ्यांनी घरकुल योजनेंतर्गत लाभ मिळण्यासाठी अर्ज केला आहे परंतु त्यांना काही कारणास्तव घरकुल योजनेचा लाभ मिळाला नाही तसेच ज्या लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ घ्यावयाचा आहे असे जुने व नवीन लाभार्थी यांनी प्रत्यक्ष सर्व आवश्यक कागदपत्रासह उपस्थित रहावे. या शिबिरात झोननिहाय अर्ज स्वीकारण्यात येतील. लाभार्थी ज्या झोनचा असेल त्यांनी आपला अर्ज संबंधित झोनच्या टेबलवर सादर करावा. त्यानंतर अर्जावर नियमानुसार कार्यवाही करण्यात येणार आहे.

इच्छुकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त सिद्धार्थ गायकवाड, सहाय्यक आयुक्त सुकेशिनी तेलगोटे यांनी केले आहे.





  Print






News - Nagpur




Related Photos