महत्वाच्या बातम्या

 परीक्षा केंद्र परिसरात कलम १४४ लागू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : उच्च माध्यमिक व माध्यमिक शालांत  प्रमाणपत्र परीक्षा जिल्ह्यातील विविध केंद्रावर आयोजित करण्यात आल्या आहे. सदर परीक्षा केंद्रावर गैरप्रकार होऊ नये यासाठी परीक्षा कालावधीत केंद्राच्या परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ लागू करण्यात आले आहे.

इयत्ता १२ वीची २१ फेब्रुवारी ते १९ मार्च तसेच माहिती तंत्रज्ञान व सामान्य ज्ञान या विषयाची ऑनलाईन परीक्षा २० ते २३ मार्च या कालावधीत व इयत्ता १० वीची १ ते २६ मार्च दरम्यान घेण्यात येत आहे. परीक्षांचे संचालन सुयोग्य प्रकारे व्हावे. यासाठी परीक्षा कालावधीत सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळात जिल्ह्यातील सर्व परीक्षा केंद्राच्या १०० मीटरच्या परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता कलम १४४ अन्वये  प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहे. 

परिक्षेकरीता जिल्ह्यातील सर्व परीक्षा केंद्राच्या १०० मीटर परिसरात २ अथवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींच्या जमावावर आणि सदर परीक्षा केंद्राच्या १०० मीटरच्या परीसरात सर्व झेरॉक्स, मोबाईल, एसटीडी, आयएसडी, फॅक्स, संगणक, ई-मेल, इंटरनेट इत्यादी ईलेक्ट्रॉनिक उपकरणे व ईलेक्ट्रॉनिक सुविधांच्या वापरावर व परीक्षा केंद्राजवळील १०० मीटर परीसरातील केंद्र सुरु राहण्यांवर निर्बंध, प्रतिबंध लावण्यात आले आहे. या आदेशाचे काटेकोरपणे पालन करावे, असे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी काढलेल्या आदेशात नमुद करण्यात आले.





  Print






News - Wardha




Related Photos