शेतात गांजाची अवैध लागवड : पाच किलो ओला गांजा जप्त


- देवळी पोलिसांची पाचगाव पुनर्वसन येथे कारवाई; ८५ हजार ५६० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : देवळी तालुक्यातील पाचगाव (पुनर्वसन) येथे शेतात गांजाची अवैध लागवड केल्याचा प्रकार पोलिसांच्या कारवाईत उघडकीस आला आहे. देवळी पोलिसांनी संबंधित शेतात छापा टाकून ५ किलो ७०४ ग्रॅम ओला गांजा जप्त केला. जप्त करण्यात आलेल्या गांजाची अंदाजे किंमत ८५ हजार ५६० रुपये असून, या प्रकरणी बळीराम दौलत शिवरकार (५५, रा. पाचगाव पुनर्वसन) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाचगाव (पुनर्वसन) परिसरात एका शेतात गांजाची अवैध लागवड करण्यात येत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे देवळी पोलिसांच्या पथकाने शनिवारी सायंकाळी संबंधित शेतात छापा टाकला.
यावेळी शेतात गांजाची लागवड केल्याचे आढळून आले. पोलिसांनी कारवाईदरम्यान ५ किलो ७०४ ग्रॅम वजनाचा ओला गांजा जप्त केला. या कारवाईत एकूण ८५ हजार ५६० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. या प्रकरणी आरोपी बळीराम शिवरकार याच्याविरुद्ध देवळी पोलिस ठाण्यात अमली पदार्थ प्रतिबंधक कायदा (एनडीपीएस) अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गांजाची अवैध लागवड केल्याप्रकरणी पोलिसांकडून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई -
ही कारवाई पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, अपर पोलिस अधीक्षक सदाशिव वाघमारे आणि पुलगावचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. वंदना कारखेले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. देवळीचे ठाणेदार संदीप कापडे यांच्या नेतृत्वात पोलिस पथकाने ही कारवाई केली. या पथकात पोलिस उपनिरीक्षक शिवराज जाधव, पोलिस उपनिरीक्षक मगरे, विनोद कांबळे, अमोल आलवडकर, निलेश तेलरांधे, गजानन महाकाळकर, आकाश कसर आणि संतोष गिते यांचा समावेश होता. शेतात गांजाची अवैध लागवड होत असल्याचा प्रकार उघडकीस आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.




Petrol Price




