शिक्षक समिती चामोर्शी पंचायत समिती प्रशासनाविरोधात आंदोलनाच्या पावित्र्यात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / आष्टी :
विविध प्रलंबित मागण्या सोडविण्याबाबत केवळ आश्वासने देण्याचे काम केले. मात्र समस्या निकाली न काढल्यामुळे  महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती चामोर्शीच्या वतीने पंचायत समितीच्या संवर्ग विकास अधिकारी यांना निवेदन देऊन आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. ७ सप्टेंबर  पासून बेमुदत उपोषण करणार असल्याचे शिक्षक समितीने  कळविले आहे. 
 पंचायत समिती चामोर्शीच्या प्रशासनास गेले कित्येक महिन्यांपासून निवेदन देऊन, प्रशासनाशी चर्चा करून सुध्दा प्रत्येक वेळी प्रशासनाने आश्वासन दिले. परंतु आजतागायत कित्येक समस्या कायम आहेत. त्यात नवीन समस्यांची भर पडत आहे. त्यामुळे शेवटी शिक्षक समिती ने बेमुदत उपोषण आंदोलन करण्याचे ठरविले आहे. त्यानुसार संघटनेच्या वतीने जिल्हा परिषद, पंचायत समिती, व तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन ला निवेदन देण्यात आले आहे. 
७  व्या वेतन आयोगाचा थकबाकीचा पहिला हप्ता जि. पी. एफ. खात्यात त्वरीत जमा करणे,  डी सी पी एस धारक शिक्षकांचे ७  व्या वेतन आयोगाचा थकबाकीचा पहिला हप्ता रोखीने त्वरीत अदा करणे,  डी सी पी एस धारक शिक्षकांचे डी सी पी एस कपातीचे मागील हिशेब अद्ययावत करून जमा पावती सबंधितास अदा करणे.त्या करिता कृतीकार्यक्रम आयोजित करणे व हिशेब अद्ययावत करणे, ७  व्या वेतन आयोगाच्या थकबाकीचे विवरण पत्र प्रत्येक शिक्षकास देणे, ७  व्या वेतन आयोगाच्या वेतन निश्चितीचे पत्र सर्व शिक्षकांना देणे, ३१ ऑगस्ट २०१९ पर्यंत १२ वर्ष पूर्ण झालेल्या सर्व शिक्षकांचे वरिष्ठ स्तर मंजुरीचे प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे पाठविणे,  सेवेत स्थायी करण्याचे प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे पाठवून ते मंजूर करून घेणे, सेवेत नियमित करण्याचे प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे पाठवून ते मंजूर करून घेणे,  सेवा पुस्तकात रजेच्या नोंदी अद्ययावत करून सेवा पुस्तक रजा नोंदी घेणे, रजांचा हिशेब अद्ययावत करणे,  सहायक लेखाधिकारी  दुर्गे  यांचेकडील लेखा विषयक प्रभार काढणे, शिक्षिका   बी. पी. राचलवार यांचे थकबाकी देयक मागील १० महिन्यापासून प्रलंबित असून ते अदा करणे, शिक्षक  मुनगंटीवार  यांच्या मृत्यू उपदाणातून कपात रक्कम पुन्हा परत करण्याचे पत्र मागील पंचायत समिती ला प्राप्त असून सुध्दा कित्येक महिन्यांपासून रक्कम त्यांच्या वारसदारास अदा केले नाही, ती रक्कम अदा करणे,  अपघात विम्याची नोंद सेवापुस्तकात घेणे, पदवीधर शिक्षक यांचे ७ व्या वेतन आयोगा नुसार करण्यात आलेले  वेतन निश्चिती योग्य आहे किंव्हा नाही याकरिता त्यांचे सेवापुस्तक तपासणी करीता जिल्हा परिषदेस पाठविणे, श्रीमती तराळे  यांचे दोन महिन्याचे वैद्यकीय रजा मंजूर करून वेतन अदा करणे, मानमपल्लीवार  , हाताडकर , आत्राम  ,सिंगरेडिवार  यांचे देयके लेखा विभागात प्रलंबित असून ते त्वरीत अदा करणे,  शालेय पोषण आहार मेहणताना प्रत्येक महिन्यास अदा करणे या व इतर सर्व एकूण ३५ समस्या पंचायत समिती ने प्रलंबित ठेवल्यामुळे शिक्षक समिती चामोर्शीने आंदोलनाचा पावित्रा घेतला आहे.  समस्या  निकाली निघेपर्यंत  पंचायत समिती चामोर्शी समोर बेमुदत उपोषण  शनिवार ७ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजता पासून सुरू करण्यात येणार आहे. या आंदोलनात सर्व शिक्षक - शिक्षिकांनी  सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-09-03


Related Photos