महत्वाच्या बातम्या

 जाणता राजा महानाट्याच्या तयारीला वेग


- खात रोडवरील रेल्वे ग्राऊंडवर तीन दिवस प्रयोग

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / भंडारा : भंडारा प्रशासनामार्फत १७, १८ व १९ जानेवारीला जाणता राजा महानाटयाचा प्रयोग होणार आहे. या महानाट्यासाठीच्या तयारीला वेग आला असून स्टेजसह इतर तयारीला सुरुवात झाली आहे.

या महानाट्यासाठी स्टेज, सीसीटीव्ही कॅमेरे, कचरागाड्यांची व्यवस्था, साईड पॅनल अशा तयारीला सुरुवात झाली आहे. इतिहासकार शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी लिखित व दिग्दर्शित केलेला हा प्रयोग भंडाऱ्यात होणार आहे.

३५० व्या शिवराज्याभिषेक वर्षानिमित्य प्रत्येक जिल्ह्यात महानाट्याचे सादरीकरण करण्याचे राज्य शासनाने ठरवले आहे. या उपक्रमातील दुसरा प्रयोग नागपूरनंतर भंडारा येथे होत आहे.

शिवछत्रपतींच्या जन्मापासून राज्याभिषेकापर्यंतच्या रोमांचकारी प्रसंग जाणता राजा मध्ये दाखविण्यात येणार आहे. राज्याचा सांस्कृतिक विभाग, जिल्हा प्रशासनामार्फत या महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी प्रवेशिका असेल, मात्र प्रवेश मोफत ठेवण्यात आला आहे.

दररोज सायंकाळी पाच वाजतानंतर या प्रयोगाला सुरुवात होईल. उंट, घोडे यांचा वापर आणि शिवरायांच्या काळातील सर्व रोमांचक घटनाक्रम, शिवराज्यभिषेकचे जिवंत चित्रण  कलाकार करणार आहेत.





  Print






News - Bhandara




Related Photos