राज्य शासनाच्या मेगा भरतीमध्ये ३२ हजार जागांसाठी ३२ लाखांहून अधिक अर्ज


वृत्तसंस्था /  मुंबई : राज्य शासनाने सुरू केलेल्या मेगा कर्मचारी भरतीसाठी २ हजार जागांसाठी ३२ लाखांहून अधिक अर्ज आल्याची माहिती प्राप्त झाली आहे. 
ग्रामविकास विभागातील १३ हजार ५१४ पदांसाठी तब्बल ११ लाख २० हजार अर्ज आले आहेत. पशुसंवर्धन विभागांतर्गत भरावयाच्या ७२९ पदांसाठी ३ लाख ३० हजार अर्ज आले आहेत. याचा अर्थ सरासरी एका जागेसाठी ४५२ अर्ज आले आहेत. एकूण १३ शासकीय विभागांमधील ३१ हजार ८८८ जागा भरण्यात येत असून त्यात मुख्यत्वे वर्ग क आणि ड (तृतीय व चतुर्थ श्रेणी) च्या पदांचा समावेश आहे. त्यात मुख्यत्वे कृषी, सार्वजनिक बांधकाम, पशुसंवर्धन, वित्त, जलसंधारण, ग्रामविकास, वने आदी विभाग आहेत. वित्त विभागातील ९३२ पदांसाठी अर्जाची संख्या १ लाख ७० हजार आहे. वन विभागाच्या ९५१ पदांसाठी ४ लाख २ हजार अर्ज आले आहेत. तर, महसूल विभागातील १८०२ पदांसाठी ५ लाख ६४ हजार तरुण-तरुणी रांगेत आहेत.   Print


News - Rajy | Posted : 2019-08-22


Related Photos